केंजळ मध्ये सॅनिटायझरचे वाटप व सोडियम हायपो क्लोराईड ची फवारणी.

Maharashtra varta
(विघ्नहर्ता प्रतिष्ठान विघ्नहर्ता पतसंस्था व ग्रामपंचायत केंजळ यांच्या वतीने प्रत्येक  कुटुंबास सॅनिटायझर चे वाटप करताना चंद्रकांत दादा बाठे.)
■■■■■■■■■■■■■■■■■
कापूरहोळ( प्रतिनिधी):---विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

आदर्श ग्राम केंजळ ता. भोर येथे सॅनिटायझरचे वाटप व सोडियम हायपो क्लोराईड ची फवारणी 
विघ्नहर्ता प्रतिष्ठान व विघ्नहर्ता पतसंस्था व ग्रामपंचायत केंजळ यांच्या वतीने  करण्यात आले.

विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी ग्रामपंचायत विविध उपाययोजना राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून विघ्नहर्ता प्रतिष्ठान विघ्नहर्ता पतसंस्था व ग्रामपंचायत केंजळ यांच्या वतीने प्रत्येक  कुटुंबास सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले .त्याचप्रमाणे केंजळ व काळेवाडीतील संपूर्ण गावात  सोडियम हायपो क्लोराईड ची फवारणी करण्यात आली .

त्यावेळी विघ्नहर्ता प्रतिष्ठान व विघ्नहर्ता पतसंस्थेचे चेअरमन  चंद्रकांत बाठे, सरपंच  माया नेवसे,उपसरपंच महेश बाठे, ग्रामपंचायत सदस्य उत्तम बाठे, गणेश भालघरे, अविनाश जाधव लेंडवे ग्रामविकास अधिकारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच सामाजिक कार्यकर्ते उत्तम  बाठे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पांडुरंग बाठे, आणि  युवराज काळे हे उपस्थित होते. 

चंद्रकांत बाठे यांनी "महाराष्ट्र वार्ताशी" बोलताना सांगितले की,लॉकडाऊन काळात कोणीही घराबाहेर पडू नये .स्वतःबरोबर आपल्या कुटुंबाची काळजी घ्या,असे त्यांनी सांगितले.
To Top