■■■■■■■■■■■■■■■■■
कापूरहोळ (प्रतिनिधी):---विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
भोर तालुक्यातील रहिवास करणा-या सर्व नागरिक, स्थलांतरित मजूर आणि पदाधिकारी यांना सूचित करण्यात येते की, COVID-19 च्या पार्श्वभूमीवर जे नागरिक आणि मजूर हे भोर तालुक्यातील विविध भागांमध्ये अडकलेले आहेत, त्यांचेकडून वारंवार खाण्याचे जिन्नस, किराणा, पुरवठा विभागातील धान्य यांची मागणी तहसीलदार कार्यालय भोर कडे केली जात असल्याची माहिती भोरचे तहसीलदार तथा अध्यक्ष,तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती, भोर अजित पाटील यांनी "महाराष्ट्र वार्ताशी" बोलताना सांगितले
माहिती देताना ते म्हणाले की,पुरवठा विभाग , तहसील कार्यालय भोर यांचेकडे फक्त आणि फक्त एप्रिल महिन्याचे विविध योजना अंतर्गत धान्य केवळ नेहमीच्याच पात्र शिधापत्रिकाधारकांना शासन निर्देशानुसार उपलब्ध करण्यात आलेले आहे. याच शिधापत्रिकाधारकांना अंत्योदय व अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत त्यांचे योजनेचे धान्य उचलल्यानंतर प्रति व्यक्ती पाच किलो प्रमाणे तांदूळ 10 एप्रिलनंतर मोफत दिले जाणार आहे.
तहसीलदार कार्यालयाला येणारे फोन हे मोफत धान्य मिळण्याच्या मागणीचे असतात.या संकटाच्या समयी तहसीलदार कार्यालय अधिकारी कर्मचारी यांच्या योगदानातून, दानशूर व्यक्ती तसेच स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आपली अन्नधान्याची गरज भागविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी तालुक्यातील दानशूर व्यक्ती, पदाधिकारी व स्वयंसेवी संस्था यांनी भरघोस मदत केली आहे व यापुढे ते अशी मदत करत राहतील अशी अपेक्षा बाळगतो.असे ते म्हणाले.
ज्या व्यक्ती-कुटूंब खऱ्याच गरजू आहेत, त्यांनी संबंधित तलाठी, ग्रामसेवक, मंडलाधिकारी यांना संपर्क करावा. त्यांची अन्नधान्याची गरज भागविण्याचा आम्ही या दानशूर व्यक्ती व संस्थांच्या माध्यमातून अवश्य प्रयत्न करू.असे ते म्हणाले.
कोरोना चे संकटांमध्ये आपआपल्या घरी राहून व सोशल डिस्टन्स पाळून प्रशासनास सहकार्य करावे ही विनंती करण्यात आली आहे.
बातम्यांसाठी संपर्क:--
विठ्ठल पवार.
पत्रकार.
मो. नं.९२२६८००७८३
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
