अन्नधान्य व आवश्यक वस्तूंचे वाटप.

Maharashtra varta
("जन आरोग्य अभियान मदत" मोहिमेच्या माध्यमातून
वागजवाडी येथील कातकरी समाजातील 30 कुटुंबातील एकूण 135 लोकांना अन्नधान्य व आवश्यक वस्तूंचे वितरण करताना)
■■■■■■■■■■■■■■■

कापूरहोळ( प्रतिनिधी):----विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

दि-31मार्च 2020 रोजी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील वागजवाडी येथील कातकरी समाजातील 30 कुटुंबातील एकूण 135 लोकांना अन्नधान्य व आवश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. श्रीपाद कोंडे, कल्पना आवळे यांची  या कामी विशेष मदत झाली. 



तसेच पिंपरी चिंचवड येथील कारखाने बंद असलेल्या 10 मजूरांना (उत्तर प्रदेश येथून आलेले) अन्न धान्य व आवश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. डॉ बेरी, सचिन देसाई, स्वप्नीलक जवळे यांची विशेष मदत झाली. 

जन आरोग्य अभियानाच्या या मोहिमेत भाग घेणाऱ्या व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार  मानण्यात आले.

डॉ. अभिजित मोरे, शकुंतला भालेराव, श्रीपाद कोंडे, सीमा धुमाळ, भाऊसाहेब आहेर, शैलजा अरळकर, काजल जैन, हेमा पिसाळ, तृप्ती जोशी, डॉ बेरी, सचिन देसाई, अविनाश पवार, श्वेता मराठे, डॉ अरुण गद्रे, सुरेखा गाडे यांनी विशेष मदत व सहकार्य जन आरोग्य  अभियान पुणेच्या माध्यमातून केले.

(महाराष्ट्र वार्ताशी बोलताना श्रीपाद कोंडे म्हणाले की,आपण राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून देशावर आणि राज्यावर आकस्मित आलेल्या कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी  आपल्या मदतीची देशाला आणि राज्याला गरज असल्याने कोरोनाच संकट निवारणासाठी सढळ हाताने मदत करु या. आणि आपल्या देशबांधवांचे प्राण वाचवू या.देशासाठी आणि देशबांधवांसाठी. स्वतःचा,कुटुंबाचा विचार न करता अहोरात्र कोरोनाशी मुकाबला करत असलेले आपले जिगरबाज डॅॅाक्टर्स ,आरोग्य कर्मचारी,पोलिस,सैनिक आणि सर्व शासकिय कर्मचारी यांचे मनोधैर्य वाढवू या. त्यासाठी गरज आहे फक्त आपल्या मदतीच्या हाताची.)

विठ्ठल पवार.
पत्रकार ,पुणे (भोर)
मो. नं.९२२६८००७८३.
◆●●◆◆◆●●●●◆●◆●●◆◆◆●●●◆◆◆◆◆◆
To Top