तीस मोटरसायकलस्वारांवर गुन्हे दाखल.

Maharashtra varta
(राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एकूण तीस मोटरसायकलस्वारांवर अनावश्यक फिरल्याने  त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले )
__________________________________________

कापूरहोळ (प्रतिनिधी):---- विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
 
दि.31मार्च 2020 रोजी राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एकूण तीस मोटरसायकलस्वारांवर
अनावश्यक फिरल्याने  त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्या मोटरसायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संपूर्ण देश 'लॉकडाऊन' करण्यात आलेला आहे. या बाबत निवेदनाद्वारे सारोळा, किकवी,कापूरहोळ, नसरापूर,खेडशिवापुर परिसरातील दुचाकीस्वार अनावश्यक फिरताना दिसल्यास राजगड पोलीस स्टेशन, नसरापूर हे त्यास ताब्यात घेऊन त्याची दुचाकी जप्त करून 15 दिवस नसरापूर येथील कुंभारकर लॉन्स,मंगल कार्यालयात होम क्वारंटाईन केले जाणार आहे.याची पूर्वकल्पना  सोशल मीडियाद्वारे राजगड पोलीस स्टेशन ने दिली होती. मात्र  काही दुचाकीस्वारांनी ही बाब गांभीर्याने न घेता अनावश्यक फिरल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून कलम 188 प्रमाणे कारवाई करण्यात आली असल्याची माहिती राजगड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी दिली.


To Top