प्रशांत ऊर्फ बाबुदादा धुमाळ यांचे अकाली निधन .

Maharashtra varta

■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
कापूरहोळ:(प्रतिनिधी)----विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

"बोट सुटले हातून तरी
स्मरण होत राहील,अंतरी.
वात्सल्याचा राहो सदा 
आशिर्वाद आम्हावरी.
घेऊनी सामाजिक मानवी मूल्यांचा वसा..
समाजात उमटवला वेगळाच ठसा.
लोकसेवेची आवड भारी
स्नेह फुलविला दारोदारी"....

असे आदर्श जीवन जगून धुमाळ  कुंटुबाला आणि , गावास नवी दिशा व प्रेरणा देणारे ,माणसातील आदर्श  माणूस असलेले पसुरे ता. भोर चे मा .उपसरपंच , गावाचा  एक चांगला लोकप्रतिनिधी तसेच निसर्गप्रेमी, व्यक्तिमत्त्व राजकीय,सामाजिक,शैक्षणिक, ऐतिहासिक विषयांची अभ्यासू व्यक्तिरेखा असलेले प्रशांत ऊर्फ बाबुदादा सुरेश धुमाळ (वय45)यांचे हृदयविकाराने निधन झाले. 

प्रशांत ऊर्फ बाबुदादा सुरेश धुमाळ यांचे सोमवार दि.30 मार्च 2020 रोजी निधन झाले.त्यांच्या मागे आई,भाऊ,पत्नी,एक मुलगा असा परिवार आहे.


प्रशांत उर्फ बाबुदादा यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर
लहान पणापासून संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी मुंबई येथे एकाकी पणे पार पाडत कुटुंब स्थिरस्थावर केले. .उद्योग व्यवसायाची आवड असल्याने नोकरी न करता भोर मधून च मिठाचा व्यापार चालू करून आज रिलायन्स,हिंदुस्थान युनीलिव्हर,इत्यादी कंपन्यांची जाहिरात एजन्सी चालवत होते.
सन २०१२ साली गावच्या निवडणूक मध्ये निवडून येऊन उपसरपंच पद सांभाळत गावचा विकास कामा मध्ये चेहरा मोहरा बदलला.पसुरे गावात अंदाजे स्वखर्चाने दहा  हजार झाडे दरवर्षी लावत व त्याचा सांभाळ करत.पसुरे गावातील  शाळा संगणकीकृत करण्यात मोलाचा वाटा आहे.

त्यांच्या निधनाने गावच्या सामाजिक ,सांस्कृतिक ,उद्योग क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे व्यक्तिमत्व आदर्श व मनमिळाऊ, नेत्रदीपक होत.एका चांगल्या व्यक्तीला आपण मुकलो आहोत.अश्या आदर्श माणसाला अर्थात प्रशांत उर्फ बाबुदादा   यांना  "महाराष्ट्र वार्ताच्या" वतीने भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐💐💐💐💐💐💐
----------------------------------------------------------------
विठ्ठल पवार.
पत्रकार, 
मो. नं.९२२६८००७८३.
-----------------------------------------------------------------
To Top