__________________________________________
कापूरहोळ( प्रतिनिधी):(दि-30)----विठ्ठल पवार.
महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संपूर्ण देश 'लॉकडाऊन' करण्यात आलेला आहे.
सारोळा, किकवी,कापूरहोळ, नसरापूर,खेडशिवापुर परिसरातील दुचाकीस्वार अनावश्यक फिरताना दिसल्यास राजगड पोलीस स्टेशन, नसरापूर हे त्यास ताब्यात घेऊन त्याची दुचाकी जप्त करून 15 दिवस नसरापूर येथील कुंभारकर लॉन्स,मंगल कार्यालयात होम क्वारंटाईन केले जाणार असल्याची माहिती राजगड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस दत्तात्रय दराडे यांनी दिली.
पुढे बोलताना दराडे म्हणाले की, दुचाकीस्वारांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी ,अनावश्यक फिरू नये.सारोळा, किकवी,कापूरहोळ, नसरापूर,खेडशिवापुर परिसरात पोलिसांकडून नाकाबंदी केलेली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राजगड पोलिसांकडून जनतेला घरातून बाहेर न पडणे बाबत वारंवार आवाहन करण्यात येत आहे. परंतु काही लोक सदरच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अडथळे येत आहेत. पोलिसांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून विशेषतः दुचाकीस्वार लोक व युवक रस्त्यावरती अनावश्यक फिरताना वारंवार दिसत आहेत. लॉकडाऊन प्रभावीपणे राबवण्यासाठी अशा दुचाकी स्वारांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी घरातून बाहेर पडू नये व दुचाकीवरून अनावश्यक फिरू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई करून होम क्वारंटाईनच करावे लागेल.
