कापूरहोळ (प्रतिनिधी) :----विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
कोरोनानं जगभर अवघ्या मानवजातीला घेरलं आहे. कोरोना विषाणूचे महासंकट आपल्या देशावर आले आहे.आपल्या देशात आणि महाराष्ट्रात रूग्णाची संख्या सातत्यानं वाढत आहे. त्यामुळं रक्ताचा तुटवडा जाणवतो आहे.आरोग्यमंत्री राजेशजी टोपे ही गोष्ट सातत्यानं अधोरेखित करीत आहेत.कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे व साशंक वातावरण आहे. सर्व व्यवस्थांवर विपरीत परिणाम झाला आहे. तसेच ब्लड बँक मधील रक्ताचा साठा कमी आहे.रक्ताची आवश्यकता असणारे रूग्ण मोठ्या प्रमाणात आहेतच.त्यांची गरज पूर्ण होण्यासाठी व कोणीही रूग्ण रक्त न मिळाल्याने दगावू नये.ह्यासाठी सामाजिक जबाबदारी म्हणून रक्तदान करा व देशसेवेत योगदान द्या असे विनम्र आवाहन "पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीलजी लोणकर" यांनी "महाराष्ट्र वार्ताशी" बोलताना केलं आहे.
मराठी पञकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा.एस.एम.देशमुख सर यांनी पञकार संघ व इतर सामाजिक संस्थांनी रक्तदान शिबीरे आयोजित करुन रक्त तुडवडा भरुन काढून देशसेवा करावी असे कळकळीचे आवाहन केले होते.त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मराठी पञकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे व पुणे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा पञकार संघ,पुरंदर तालुका पञकार संघ,भिवरी ग्रामपंचायत,ग्रामस्थ व नवनाथ देवस्थान पंचायत कमिटी ट्रस्ट श्रीक्षेञ कानिफनाथ गड बोपगाव यांच्या वतीने व अक्षय ब्लड बँक यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीर मंगळवार दि.३१ मार्च सकाळी १० वा.ते दु २ वा. च्या दरम्यान जि.प.प्रा.शाळा - भिवरी, ता.पुरंदर ,जि.पुणे येथेआयोजित केले आहे.तरी आपण रक्तदान करुन देशसेवा करावी अशी विनंती करण्यात आली आहे.
BP, Sugar, सर्दी, ताप, खोकला नसणारे व तंदुरुस्त असणाऱ्या व्यक्तींचेच तसेच प्राथमिक तपासणी केल्यानंतरच ब्लड घेण्यात येणार असून कोरोना संदर्भातील सर्व काळजी घेण्यात येणार असून रक्तदान करू इच्छिताना कुठलाही त्रास होणार नाही याची संपूर्ण काळजी घेण्यात येणार आहे.
रक्तदान करण्यासाठी जिल्हा , तालुका पञकार संघाचे पदाधिकारी, भिवरीकर मान्यवर ग्रामस्थ व नवनाथ देवस्थान विश्वस्त यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन "पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीलजी लोणकर" यांनी केले आहे.
बातम्या साठी संपर्क....
विठ्ठल पवार.
पत्रकार ,
मो. नं.९२२६८००७८३.
