==================================
कापूरहोळ (प्रतिनिधी):-----विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन, पुणे)
कोरोना संक्रमण पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा भासत आहे.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सूचनेनुसार राज्य सरकारच्या रक्तदान करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी "शंभू तीर्थ" कापूरहोळ ता. भोर येथे रक्तदान शिबिर आयोजित केले गेले. त्यानुसार या शिबिरात शेकडो युवकांनी व नागरिकांनी सहभागी होऊन सक्रियतेने रक्तदान करून राष्ट्रकार्यासाठी उत्कृष्टरित्या हातभार लावला.
शनिवार दि. 28 मार्च 2020 रोजी कापुरहोळ येथील "विठ्ठल रुक्मिणी मंदिरात" या रक्त दान शिबिराचे आयोजन करण्यात आले.या कामी धनकवडी पुणे येथील आधार ब्लड बँकेचे सहकार्य मिळून त्यांचे डॉक्टर , नर्स व कर्मचारी उपस्थित होते.या शिबिरात 112 बाटल्याहून अधिक रक्तदान झाले. कापूरहोळ पंचक्रोशीतील नागरिक व युवकांनी स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान केले.
रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी त्यांना वेळ दिलेली होती. तसेच संपर्क क्रमांक दिले होते.त्यानुसार नागरिक टप्याटप्याने आल्याने गर्दी झाली नाही. रक्तदान झालेवर प्रत्येक वेळी बेडवर फवारणी करुन निर्जंतुक केले गेले. राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वाच्या सूचनांचे काटेकोर पद्धतीने पालन करण्यात आले.
यावेळेस नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. कापसीकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट दिली. तसेच या शिबिरासाठी राजगड पोलीस स्टेशन नसरापूर व तहसीलदार भोर यांनी शिबीर आयोजनाबाबत संमती देऊन सहकार्य केले
या शिबिरासाठी" वीर धाराऊ माता प्रतिष्ठान व कापूरहोळ ग्रामपंचायत व ग्रामस्थ, व परिसर यांनी मोलाची मदत केली. यावेळेस भोर पंचायत समितीचे सदस्य रोहन बाठे,पंकज (बाबी) गाडे,किरण गाडे , दिलीप बाठे ,योगेश गाडे,गुलाब गाडे.शैलेजा अहिरे,विकास गाडे, संतोष गाडे ,अक्षय गाडे,कुणाल गाडे,अभिजित गाडे राम पाचकाळे ,दत्तात्रय बाठे,विक्रांत पाचकाळे,सागर पांगारकर, परशुराम मालुसरे,दत्तात्रय पांगारे,विष्णू बाठे,आदींनी व नागरिकांनी मोलाची मदत व उत्कृष्ट रित्या संयोजन करून शिबीर यशस्वी रित्या पार पाडले.
विठ्ठल पवार.
पत्रकार.
मो. नं.९२२६८००७८३.
