(वेळू गावात चौका -चौकात ,अंतर्गत रस्त्यावर व शाळा,अंगणवाडी परिसर ,मंदिर,सामाजिक सभागृहे, ,गावातील नागरिक यांची बसण्याची ठिकाणे येथे औषध फवारणी करताना)
==================================
कापूरहोळ (प्रतिनिधी):----- विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन) :
जगभरात कोरोना विषाणू ने थैमान घातलेले असताना सुरक्षेचा उपाय म्हणून वेळू ता. भोर येथे वेळू ग्रामपंचायत यांनी उस्फूर्तपणे वेळू गावात येणारे रस्ते बंद ठेऊन कोरोना विरोधात प्रभावी जनजागृती व अंमलबजावणी केली आहे. अशी माहिती वेळूच्या सरपंच वैशाली गिरी गोसावी यांनी महाराष्ट्र वार्ताशी बोलताना सांगितले.
वेळू ता. भोर च्या ग्रामसेविका रेखा रणनवरे ह्या पंचायत समिती ,भोरचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वेळू गावात ग्रामपंचायतीचे सरपंच ,उपसरपंच व सदस्य व गावातील नागरिक यांच्या मदतीने व सहकार्याने कोरोनाबाबत प्रभावी जनजागृती गेली 15 दिवस उत्कृष्ट रित्या करीत आहेत.वेळू गावात घराघरात हँड वॉश चे वाटप करून हात धुणे याबाबत प्रात्यक्षिक दाखवण्यात येऊन गावांतील प्रत्येक घरात कोरोनाबाबत पत्रके वाटून जनजागृती करण्यात येत आहे.संपूर्ण गावात, चौका चौकात अंतर्गत रस्त्यावर व शाळा,अंगणवाडी परिसर ,मंदिर,सामाजिक सभागृहे, ,गावातील नागरिक यांची बसण्याची ठिकाणे येथे औषध फवारणी करण्यात आली आहे. तसेच चार चाकी गाडीवर ध्वनी क्षेपक लावून कोरोना बाबत काळजी घ्या, घरात थांबा, मीच माझा रक्षक,याचे महत्व पटवून देण्यात येत आहे. तसेच ग्रामपंचायत वेळू यांच्या वतीने सार्वजनिक ठिकाणाहून नागरिकांनी दूध न आणता व गर्दी न करता दूध वाल्यांची घरपोच दूध सेवा पुरवण्यात येत आहे. आणि कोरोना रोखण्याबाबत गावपातळीवर विविध कृती समित्या स्थापून तशी यादी ग्रामपंचायत वेळू यांनी प्रसिद्ध करून कार्यन्वित केली आहे.
नागरिकांची किराणा माल दुकानाच्या समोर गर्दी न होणेसाठी दुकानाच्या बाहेर 5 फुटांवर गोल मारून नागरिकांनी त्या ठिकाणी उभे राहत असून त्यांना त्या जागेवर किराणा माल,भाजीपाला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांची गर्दी होताना दिसत नाही.
.वेळू परिसरामध्ये बाहेर गावातून येणाऱ्या व्यक्ती त्यांची संपूर्ण माहिती ग्रामपंचायत येथे नोंद केली जात आहे, त्या अनुषंगाने गावातील लोकांनी त्यांची नाव नोंदणी ग्रामपंचायत कार्यालय वेळू येथे केली आहे. तसेच भोर तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रामधील डॉक्टर यांच्याशी संपर्क करून गावात आरोग्य कर्मचारी,आशा सेविका यांच्यामार्फत बाहेरून आलेल्या व्यक्तीस घरी जाऊन त्यांची योग्य ती तपासणी करण्यात येत आहे.अशी माहिती आरोग्य सेविका श्रीमती ताकवणे यांनी दिली.
कोरोणा विषाणू रोखण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी संचारबंदी लागू केली आहे. म्हणून वेळू गावाने एकमुखाने ,व सर्वसंमतीने संचारबंदी बरोबरच वेळू गाव लॉक डाऊन केले आहे, 144 कलमाची अंमलबजावणी प्रभावी केली जात आहे.अशी माहिती ग्रामसेविका रेखा रणनवरे यांनी दिली आहे.
कोरोना व्हायरस जोपर्यंत आटोक्यात येत नाही तोपर्यंत वेळू गाव बंद राहील. मात्र गावांतील अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. त्यासाठी गावातील व परिसरातील सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन वेळू गावच्या सरपंच, पंचायत समिती सदस्य पुुनम पांगारे, मा.उपसभापती अमोल पांगारे, सर्व व गावातील प्रतिष्ठित नागरिक पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष ,विविध कार्यकारी सोसायटी वेळू यांनी केले आहे.
विठ्ठल पवार.
पत्रकार.
मो. नं.९२२६८००७८३.
■■■■■■■■■★©★■■■■■■■©★■■■
