पुणे( प्रतिनिधी):---
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन संघटनेने सामाजिक बांधिलकी जपत राज्यभरातील जवळपासएकूण 22000 ग्रामसेवकांचे एकदिवसीय वेतन जवळपास एकूण 30000000/-- (तीन_कोटी रूपये )कोरोना विरोधात करावयाच्या उपाय योजनांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन संघटनेने राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी "महाराष्ट्र वार्ताशी" बोलताना" सांगितले.
जगभर ,देशात व महाराष्ट्र राज्यात कोरोना व्हायरस मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. शासन स्वतः लक्ष देऊन उपाययोजना करीत आहे. त्यांच्या आवाहनानुसार राज्यभर 22 हजार ग्रामसेवक राज्यपातळीवर सतर्कता बाळगून सामाजिक राष्ट्रीय जबाबदारीची जाणीव या भूमिकेतून कार्यरत राहून जनतेला प्रभावी सेवा देत आहे.
कोरोना उपाययोजना साठी एक छोटासा सहभाग म्हणून राज्यातील 22 हजार ग्रामसेवक यांचे स्वच्छेने एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधी देत आहेत. या वेतनाची सरासरी रक्कम तीन कोटी रुपये होईल असे अपेक्षित आहे. असे मत "राज्य अध्यक्ष एकनाथराव ढाकणे" यांनी व्यक्त केले.
विठ्ठल पवार.
पत्रकार,
मो. नं.९२२६८००७८३
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■__________________________________________
