(जगदंबा युवा प्रतिष्ठानचे" अध्यक्ष पै.अक्षय अप्पा कदम यांच्या पुढाकाराने 'केळवडे' ता. भोर येथे स्वखर्चाने संपूर्ण गावांमध्ये औषध फवारणीचा उपक्रम)
==================≠=================
कापूरहोळ (प्रतिनिधी):---विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे आपलं गाव सोडून विविध शहरांमध्ये काम करणारी मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये आपआपल्या गावाला परतली आहेत. मात्र या लोकांमुळे गावातील ग्रामस्थांना कोरोना विषाणूची लागण होऊ नये, तसेच गावातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी "जगदंबा युवा प्रतिष्ठानचे" अध्यक्ष पै.अक्षय अप्पा कदम यांच्या पुढाकाराने 'केळवडे' ता. भोर येथे स्वखर्चाने संपूर्ण गावांमध्ये औषध फवारणीचा उपक्रम सुरु केलेला आहे. ही गोष्ट छोटी आहे...मात्र तितकीच डोंगराएवढी मोठी पण आहे.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षयअप्पा कदम ,उपाध्यक्ष शंभु कोंडे,व सदस्य सुरज कोंडे ,निखिल कांबळे ,सागर कडु ,अमोल कोंडे विकी कदम, प्रसाद कोंडे, किशोर कोंडे यांनी संपूर्ण गावांमध्ये येणारे रस्ते, गल्ल्या आणि गावाला लागून जाणारे काही मार्ग या सर्वांवर विविध औषधांची फवारणी केली. कोरोनासोबतच इतर कोणतीही रोगराई गावात फिरकू नये या काळजी पोटी.
जगदंबा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष 'पै.अक्षय अप्पा कदम' "महाराष्ट्र वार्ताशी" बोलताना म्हणाले की,जगभरात कोरोना विषाणू ने थैमान घातले आहे. संपूर्ण देश आज लॉक डाऊन आहे. याचे गांभीर्य प्रत्येक नागरिकांनी लक्षात घेऊन घराच्या बाहेर पडू नका.सुरक्षा हाच प्रतिबंध उपाय आहे.
