ग्रामपंचायत तेलवडी च्या वतीने हँड वॉशचे वाटप...

Maharashtra varta
(ग्राम पंचायत तेलवडी ता. भोर येथील ग्रामस्थांना हात धुण्यासाठी हँड वॉश ग्रामपंचायत मार्फत देण्यात आले. )
==================================

कापूरहोळ( प्रतिनिधी):---
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

कोरोना विषाणू संसर्ग आटोक्यात यावा, म्हणून सरकार आणि प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यांना साथ देणे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. आताच्या घडीला आपण ही शिस्त पाळताना आपला नव्हे तर समाजाचा, देशाचा विचार करणे महत्त्वाचे आहे. प्रशासनाला  साथ देऊन  कोरोनावर मात करू असे आवाहन तेलवडी-कासुर्डी गु. मा. चे ग्रामसेवक 'राहुल राठोड' यांनी केले.

 ग्राम पंचायत तेलवडी ता. भोर येथील ग्रामस्थांना हात धुण्यासाठी हँड वॉश ग्रामपंचायत मार्फत देण्यात आले. ग्रा. प .सदस्य व ग्रामस्थ व ग्रामसेवक यांच्या हस्ते  देण्यात आले.त्यावेळी राठोड ग्रामसेवक प्रत्येक नागरिकांना महिलांना कोरोना बाबत जनजागृती करत असताना बोलत होते.

 यावेळी तेलवडी गावात कोरोना रोगा विषयी  जनजागृती करण्यात आली.यावेळी संतोष धावले, ग्रामपंचायत शिपाई राजाराम धावले, आशा वर्कर सुरेखा धावले,आरोग्य सेवक बाळासाहेब पिसाळ उपस्थित होते.
___________________________________________________                                              
To Top