पुणे( प्रतिनिधी):---
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉक डाऊन लागू झालेले आहे. इंगवली ता. भोर येथील गावातील काही नागरिकांनी यात्रा उत्सव साजरा करण्यासाठी गावच्या मंदिरात नुकतीच बैठक घेतली. संचारबंदी चे आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या या नागरिकांना राजगड पोलिसांनी चांगलाच चोप दिला. तसेच इंगवलीतील या 10 ग्रामस्थांवर गुन्हा दाखल केला आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक गावात बैठका होत असतात. कोरोनाचा धोका वाढल्याने अनेक गावांनी यात्रा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय एकमुखाने घेतला. अनेक गावच्या एप्रिल व मे महिन्यात यात्रा असतात .त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी यात्रा उत्सवाचा कार्यक्रम कसा भरवायचा. यासाठी इंगवली गावात काही जणांनी बैठक भरवली गेली. जगात सुरू असलेल्या कोरोनाचे गांभीर्य यांना नसल्याचे दिसते.इंगवलीतील 10 नागरिकांवर राजगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
राजगड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी "महाराष्ट्र वार्ताशी" बोलताना सांगितले की,जगभरात कोरोना विषाणू ने थैमान घातले आहे. संपूर्ण देश आज लॉक डाऊन आहे. याचे गांभीर्य प्रत्येक नागरिकांनी लक्षात घेऊन घराच्या बाहेर पडू नका.सुरक्षा हाच प्रतिबंध इलाज आहे.
