(करंदी खे. बा. गाव लॉक डाऊन करण्याचे ठरवले आहे.करंदी खे. बा. ते कामथडी हा रस्ता बंद करण्यात आलेला असताना)
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
कापूरहोळ (प्रतिनिधी):---- विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन) :
जगभरात कोरोना विषाणू ने थैमान घातलेले असताना सुरक्षेचा उपाय म्हणून करंदी खे बा. गावातील तरुणांनी ग्रामस्थांनी व ग्रामपंचायत यांनी उस्फूर्तपणे करंदी खे. बा. गावात येणारे रस्ते बंद ठेवले आहेत. अशी माहिती करंदी खे .बा. च्या सरपंच अलका तळेकर यांनी "महाराष्ट्र वार्ताशी" बोलताना सांगितले.
.करंदी खे. बा. परिसरामध्ये बाहेर गावातून येणाऱ्या व्यक्ती त्यांची संपूर्ण माहिती ग्रामपंचायत येथे नोंद करण्याचे आव्हान करण्यात आले आहे, त्या अनुषंगाने गावातील लोकांनी त्यांची नाव नोंदणी ग्रामपंचायत कार्यालय येथे केली आहे. तसेच भोर तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र नसरापूर मधील डॉक्टर यांच्याशी संपर्क करून गावात आरोग्यकर्मचारी,अंगणवाडी सेेविका व आशा सेविका
च्या मार्फत बाहेरून आलेल्या व्यक्तीस घरी जाऊन त्यांची योग्य ती तपासणी करण्यात येत आहे.अशी माहिती ग्रामपंचायत करंदी व कृषी अधिकारी गुरव यांनी दिली.
कोरोणा विषाणू रोखण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी संचारबंदी लागू केली आहे. म्हणून गावाने संचारबंदी बरोबरच करंदी खे. बा. गाव लॉक डाऊन करण्याचे ठरवले आहे.करंदी खे. बा. ते कामथडी हा रस्ता बंद करण्यात आलेले आहे. त्यानुसार सरपंच अलका तळेकर,रुपेश गायकवाड, मनोज बोरगे ,विठ्ठल खाटपे,प्रदीप बोरगे,,शशिकांत खाटपे,शैलेश बोरगे ,विठ्ठल म्हस्के,ग्रामसेवक घोमसाळे भाऊसाहेब, राहुलदादा बोरगे ,विजय बोरगे ,उमेश मुगले, सुरेश खाटपे, नितीन चव्हाण, विशालभाऊ शिंदे, रणजित बोरगे ,तानाजी बोरगे ,सूरज बोरगे महेश खाटपे ,गणेश गोळे,या सर्वांनी तसेच ज्येष्ठ नागरिक आणि तरूणांनी शपथ घेतली की कोरोणा वायरस जोपर्यंत आटोक्यात येत नाही, तोपर्यंत करंदी खे. बा.गाव बंद ठेवण्यात येईल .तरी गाव आणि परिसरातील सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करंदी खे. बा.ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक सर्व सदस्य पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यांनी आव्हान केले आहे.
