करंदीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिर जीर्णोद्धार भूमिपूजन संपन्न

Maharashtra varta
◆●●●◆◆◆◆◆◆◆●◆◆◆◆◆◆◆◆●◆●●●●◆

कापूरहोळ:(प्रतिनिधी):---विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

एक विचार ,नेक मनाने एकत्र आल्यास कोणतेही अवघड काम सहजशक्य पूर्ण होत असते. त्या सार्वजनिक कामात ग्रामस्थांचा योगदान महत्वाचे असते.श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय सर्वानुमते होत असताना त्यामध्ये प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला पाहिजे असे आवाहन करंदीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते  प्रा. महादेव काका गायकवाड यांनी केले.

करंदी खे. बा. ता. भोर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर जीर्णोद्धार भूमिपूजन कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते. ह. भ. प. बाजीराव सणस सपत्नीक यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. 

यावेळेस करंदीचे आदर्श व्यक्तिमत्त्व 'प्रदीप अण्णा बोरगे' म्हणाले की,प्रत्येकाने या मंदिरासाठी सढळ हाताने मदत करून आपल्या गावचे मंदिर आदर्श बनवू.

यावेळेस प्रगतशील शेतकरी तानाजी नाना गोळे, मा. सरपंच अरविंद बोरगे,पांडुरंग बोरगे, ह. भ. प. आत्माराम बापू गोळे, दिलीप बोरगे,नंदकुमार बोरगे,किसन बापू खाटपे ,ग्रामपंचायत सदस्य मनोज आबा बोरगे, महादेव पोटे, कोंडीबा शिंदे,शिवसेनेचे युवा नेते आदित्य बोरगे,नितीन काका बिडकर,उद्योजक रवींद्र शेठ मांढरे उपस्थित होते.
__________________________________________
To Top