नसरापूर(प्रतिनिधी):---विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
झाडे ,वनस्पती, पशु, पक्षी जन्माला येतात आणि लयाला जातात .मनुष्याने मात्र आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून ठेवायला हवा. न पुसता येण्याजोगा कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणारे 'नसरापूरचे युवा उद्योजक व ग्रामपंचायत सदस्य संदीप कदम' आहेत, असे गौरव उदगार सिद्धिविनायक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजेंद्र डिंबळे यांनी काढले.
नसरापूर येथे युवा उद्योजक व ग्रामपंचायत सदस्य व बनेश्वर इंडेन गॅस एजन्सीचे प्रो. प्रा. संदीप कदम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी डॉ.डिंबळे बोलत होते.
या कार्यक्रमा प्रसंगी महेश जगताप, हेमंत राऊत,सुनील जामदार,चिन्मय पवार,केतनभाऊ शेटे,संजय वाल्हेकर, विजुकाका जंगम,अविनाश कोंडे,कैलास लष्कर,निलेश भाऊ वाल्हेकर,प्रसिध्द निवेदक विठ्ठल पवार आदी मित्र परिवार उपस्थित होते.
या प्रसंगी सिद्धिविनायक फाऊंडेशन,अखिल नसरापूर गाव क्रिकेट क्लब, साई मित्र मंडळ, हनुमान तरुण मंडळ,भैरवनाथ तरुण मंडळ, नटराज मित्र मंडळ, राजमुद्रा मित्र मंडळ,अखिल नसरापूर गावठाण मित्र मंडळ,,सायली उद्योग समूह आदींनी केक कापून वाढदिवस साजरा केला.
यावेळेस जिल्हा परिषद प्राथमिक शाळात शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला.
■■■■◆◆●■◆●■■◆◆◆◆◆■■■◆◆◆◆★
