कापूरहोळ (प्रतिनिधी):---विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
भोर तालुक्यातील,सर्व तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील व स्थानिक पातळीवर कार्यरत असणारे सर्व विभागाचे कर्मचारी, सर्व खात्याचे खाते प्रमुख यांना सूचित करण्यात येते की, शासनाने बऱ्याचशा अस्थापना, शाळा, कॉलेज, महाविद्यालय यांना सुट्टी जाहीर केलेली असल्याने, पुणे मुंबई व इतर ठिकाणी नोकरी व्यवसायानिमित्त परगावी असलेले आपल्या तालुक्यातील रहिवाशी परत तालुक्यांमध्ये येत असल्याची शक्यता नाकारता येणार नाही, तरी आपण सर्वांनी आपल्या गावांमध्ये, आपल्या कार्यक्षेत्रात, लक्ष ठेऊन बाहेरून येणाऱ्या व्यक्तीवर खास करून लक्ष ठेवून, कोणालाही सर्दी-खोकला-ताप व इतर करोना सदृश्य लक्षणे दिसून येत असल्यास, त्याची तात्काळ माहिती जवळचे वैद्यकीय अधिकारी, पोलिस प्रशासन व तालुका प्रशासन यांना देण्यात यावी,
जेणेकरून अशा संशयित व्यक्तीवर तात्काळ उपचार करणे व त्यापासून इतरांना संसर्ग होणार नाही यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे शक्य होईल, आपल्या तालुक्यातून घरा गणिक माणूस पुणे-मुंबई येथे कामानिमित्त व्यवसायानिमित्त असल्याने आपल्याला विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, मोठ्या प्रमाणात गर्दी होणारे कार्यक्रम टाळावेत अश्या सूचना असलेने सभा न घेता हा संदेश या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचविण्यात येत आहे, तरी आपल्या संपर्कातील सर्व ग्रुप वर हा संदेश देण्यात यावा अशी विनंती भोरचे तहसीलदार तथा अध्यक्ष,आपत्ती व्यवस्थापन समिती,भोरचे तहसीलदार अजित पाटील यांनी केले आहे.
-------------------------------------------------------------------
