__________________________________________
कापूरहोळ( प्रतिनिधी):---विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
रत्नागिरी (डेरवण) येथे झालेल्या राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत कामथडी ता. भोर ची अंकिता लक्ष्मण इंगुळकर हिने सुवर्णपदक मिळवले आहे.
अॅथलेटिक्स स्पर्धेत पुणे जिल्ह्याची खेळाडू प्रतिनिधी म्हणून ती डेरवण येथे सहभागी झाली होती.सुवर्णपदक मिळवून 'वेगवान धावपटू चा मान' तिने मिळविला आहे.
दि. 10 ते 12 मार्च 2020 रोजी डेरवण (रत्नागिरी) येथे झालेल्या "डेरवण युथ गेम 2020" 'राज्यस्तरीय पातळी' असलेली 'अॅथलेटिक्स स्पर्धा' संपन्न झाली.
पुणे जिल्हाची (रा.कामथडी ता. भोर) येथील अंकिता इंगुळकर हिने वयोगट 14 वर्ष मुलींचा गटा मध्ये 100 आणि 200 मीटर धावणे यामध्ये सुवर्ण पदक मिळवून आपल्या गावाचा, तालुक्याचा व पुणे जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला असल्याचे मत प्रशिक्षक सुध्दान्शु खैरे यांनी व्यक्त केले.
अंकिता इंगुळकर ही बनेश्वर क्रीडा प्रबोधिनी ,नसरापूर येथे उत्कृष्ट सराव करत आहे. सुध्दांशु खैरे हे तिला प्रशिक्षण देत आहे.तर शिक्षक नेते महेंद्र अप्पा सावंत व प्रफुल्ल यादव हे तिचे मार्गदर्शक आहे.
(कामथडीचे उपसरपंच शरद मांढरे यांनी सांगितले की, अंकीताची कामगिरी कौतुकास्पद ,प्रेरणादायी असून गावच्या वतीने नागरी सत्काराचे आयोजन करण्यात येणार असून तिच्या वाटचालीसाठी कामथडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करतो.)
(राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत कामथडीची अंकिता इंगुळकरला सुवर्णपदक).
