("भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघ व भोर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या " माध्यमातून भोर तालुक्यात दुर्गम डोंगरी परिसरात गोरगरीब, 125 कुटुंबाना अन्नधान्य व आवश्यक वस्तूंचे वितरण करताना)
■■■■■■■■■■■■■■■
कापूरहोळ ( प्रतिनिधी):----विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
"भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघ व भोर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या " माध्यमातून भोर तालुक्यात दुर्गम डोंगरी परिसरात गोरगरीब, 125 कुटुंबाना एकूण 1 लाख 25 हजार रुपयांचे अन्नधान्य व आवश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आल्याची माहिती भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सुदामराव ओंबळे यांनी दिली.
भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघ व भोर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या माध्यमातून 125 अन्न धान्याच्या किटचे वाटप भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशालजी तनपुरे व गटशिक्षणाधिकारी के. डी. भुजबळ, व विस्तार अधिकारी चांदगुडे,मदने व शिक्षण विस्तार अधिकारी रुईकर व भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघ व भोर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
भोर तालुक्यातील जोगवडी, हर्णस, माजगाव, लव्हेरी ,गोरड म्हसवली ,करंदी खुर्द ,करंदी बु. कांबरे खुर्द, कांबरे बु,.वाढाणे इत्यादी गावांतील गोरगरीब, मजूर,वंचित 125 कुटुंबाना या अन्नधान्याचे किट वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
अन्नधान्याचे किट साठी व वितरणासाठी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे कार्यध्यक्ष पोपटराव निगडे ,मा. अध्यक्ष महेंद्रआप्पा सावंत, भोरचे शिक्षक संघाचे अध्यक्ष सुदामराव ओंबळे,भोर शिक्षक पतसंस्था सभापती भीमराव शिंदे, सरचिटणीस विजयकुमार थोपटे, शिक्षक संघाचे पदाधिकारी विकास खुटवड, दादा बदक, नाना बदक, साहेबराव हिरगुडे आदींचे सहकार्य लाभले.
भोर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पंचवीस हजार रुपयाचा धनादेश तहसीलदार अजित पाटील यांच्याकडे देण्यात आला.
("महाराष्ट्र वार्ताशी" बोलताना "गटविकास अधिकारी, विशालजी तनपुरे म्हणाले की, ,आपण राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून देशावर आणि राज्यावर आकस्मित आलेल्या कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी आपल्या मदतीची देशाला आणि राज्याला गरज असल्याने कोरोनाच संकट निवारणासाठी सढळ हाताने मदत करु या. आणि आपल्या देशबांधवांचे प्राण वाचवू या.देशासाठी आणि देशबांधवांसाठी.)
भोर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी के. डी. भुजबळ म्हणाले की,कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव मुळे देशात,राज्यात,पुणे जिल्ह्यात तसेच भोर तालुक्यातील लॉकडाऊन करण्यात आले असताना येथील उद्योग धंदे ,रोजगार,व्यापार बंद असल्या कारणामुळे गोरगरिबांना जेवणाची प्रचंड गैरसोय होत होती, अश्या 125 गोरगरिबांना शिक्षक संघ व शिक्षक सोसायटीने केलेली मदत महत्वाची आहे.
विठ्ठल पवार.
पत्रकार, पुणे.
मो. नं.९२२६८००७८३
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
