भोर तालुका ग्रामसेवक संघटनेच्या वतीने अन्नधान्य वाटप

Maharashtra varta

("भोर तालुका ग्रामसेवक संघटनेच्या" माध्यमातून  भोर  तालुक्यात दुर्गम डोंगरी परिसरातील गोरगरीब,  नागरिकांना अन्नधान्य व आवश्यक वस्तूंचे वितरण करताना)
■■■■■■■■■■■■■■■

कापूरहोळ ( प्रतिनिधी):----विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

"भोर तालुका ग्रामसेवक संघटनेच्या  " माध्यमातून  भोर  तालुक्यात दुर्गम डोंगरी परिसरात गोरगरीब, 101 नागरिकांना  अन्नधान्य व आवश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आल्याची माहिती भोर तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष नारायण शिवरकर यांनी दिली.
 
भोर तालुका ग्रामसेवक संघटनेच्या माध्यमातून 101 नागरिकांना  व आदिवासी बांधवाना अन्न धान्याच्या किटचे वाटप भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशालजी तनपुरे व पुणे जिल्हा कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष चंद्रकांत जगताप व विस्तार अधिकारी चांदगुडे ,हुजरे,मदने व विस्तार अधिकारी राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.व भोर तालुका ग्रामसेवक संघटनेचे  पदाधिकारी उपस्थितीत होते.
या गरजु  101 नागरिकांना  दोन वेळचे जेवण करणेसाठी प्रत्येकी तांदुळ 5 कीलो , आटा 5 कीलो ,साखर 1 कीलो , तुर डाळ 1 कीलो ,तेल दोन लिटर , मिठपुडा 1 कीलो ,चहापावडर 50 ग्रॅम ,पोहे 1 कीलो ,हळद 50 ग्रॅम ,जिरी 50 ग्रॅम ,मोहरी 50 ग्रॅम , कांदे 2 किलो , बटाटा 2 कीलो,डेटॉल साबन , विम बार,रिन बार या सोळा साहित्याच कीट बनवुन देण्यात आले.

भोर तालुक्यातील  वेळवंड, डेहन, कोंडगाव,साळुंगण, सांगवी( वे. खो.)इत्यादी गावांतील अतिशय दुर्गम भागातील गरजवंत गोरगरीब, मजूर,कामगार वर्ग,वंचित 101 कुटुंबाना या अन्नधान्याचे किटचे  वाटप वाड्या  वस्त्यांवर जाऊन केले आहे. ग्रामसेवक संघटनेने  या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली आहे.

 अन्नधान्याचे किट  वितरणासाठी ग्रामसेवक संघटनेचे राहुल राठोड,गणेश राऊत,प्रसाद सोले, दुर्योधन गाराळे, राहुल पाटील, पोपट कांबळे, पद्माकर डोंबाळे यांनी गावात जाऊन वाटप करण्यासाठी मदत केली.  

(महाराष्ट्र वार्ताशी बोलताना "गटविकास अधिकारी, विशालजी तनपुरे म्हणाले की, ,आपण राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून देशावर आणि राज्यावर आकस्मित आलेल्या कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी  आपल्या मदतीची देशाला आणि राज्याला गरज असल्याने कोरोनाच संकट निवारणासाठी  सढळ हाताने मदत करु या. आणि आपल्या देशबांधवांचे प्राण वाचवू या.देशासाठी आणि देशबांधवांसाठी.)

विठ्ठल पवार.
पत्रकार, पुणे.
मो. नं.९२२६८००७८३
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
To Top