■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■__________________________________________
कापूरहोळ( प्रतिनिधी):---विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
भोर तालुक्यातील सुमारे 745 प्राथमिक शिक्षक अहोरात्र कोरोना बाबत दर्जेदार काम करताना दिसून येत आहे.भोर तालुक्याचे 'गटविकास अधिकारी विशाल तनपुरे' व 'गटशिक्षणाधिकारी के. डी. भुजबळ' यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट काम करीत आहे.
भोर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळातील काही शिक्षक तालुक्यातील गावागावातील रस्त्यांवर प्रशासनाने तयार केलेल्या 'नाका बंदी ठिकाणी' दिवस-रात्र पहारा देत आहे. तर काही शिक्षक गावात जाऊन 'कोरोना बाबत सर्वेक्षण' करण्याचे काम करताना दिसत आहेत.तर काही जण कोरोनाबाबत माहिती प्रशासनास 'दैनंदिन अहवाल' देण्याचे काम करत आहेत. तर काही शिक्षक स्वस्त धान्य दुकानातून केशरी शिधा पत्रिका धारकांना 'धान्य वाटप करताना नियंत्रक 'म्हणून जबाबदारी सांभाळत आहे.
कोरोना निर्मूलनाबाबत भोर पंचायत समितीचे सर्व विभागातील अधिकारी व सर्व कर्मचारी प्रभावी व उल्लेखनीय कामगिरी बजावताना दिसत असल्याची माहिती "भोर पंचायत समितीचे सभापती श्रीधरजी किंद्रे "यांनी दिली.