कापूरहोळ( प्रतिनिधी):--विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
स्व. रघुनाथभाऊ किंद्रे
यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन... भावपूर्ण आदरांजली*......
"आठवणी न सांगता दाटून येतात...
मन आमचे व्याकुळ करून जातात ...
प्रेमळ तुमच्या सहवासाचे क्षण..
अजूनही डोळ्यात, नकळत अश्रू आणतात.....
भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे मा. अध्यक्ष, जिल्हा नियोजन मंडळाचे मा. सदस्य, प्रदेश कार्यकारणी सदस्य ,नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष, नेरे विभाग दूध डेरी चे मा. अध्यक्ष, अश्या विविध पदांच्या माध्यमातून भाऊंना भोर तालुक्याचे "अभ्यासू नेते" म्हणून संबोधले जाते.
भाऊ हे वारकरी होते. 'वारकरी ते धारकरी' हा वारसा त्यांनी आपल्या कृतीच्या माध्यमातून जोपासला. धार्मिक वृत्ती, सचोटी, परोपकारी स्वभाव, सर्वांना बरोबर नेण्याची वृत्ती, मनमिळावू स्वभाव आदींमुळे ते सामान्य जनतेचे नेते होते. तालुक्यातील अनेक संस्थांना त्यांनी मदत केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून भोर तालुक्यांमध्ये लाखो रुपयांची विकासकामे मार्गी लावण्याचे काम करून जनतेच्या हृदयात सिंहासनावर आरूढ झाले.
सामाजिक, राजकीय प्रवासात स्व. रघुनाथ भाऊंनी प्रत्येक पदावर काम करताना त्या पदाची प्रतिष्ठा वाढेल ,अशा पद्धतीने जनसेवा केली. भोर तालुक्यातील मावळी जनतेला त्यांच्या बद्दल प्रचंड प्रेम आदर आणि आपलेपणा वाटत होता. राजकीय कारकिर्दीचा व मिळालेल्या पदांचा उपयोग कै. रघुनाथ भाऊंनी कृषी ,शिक्षण ,आरोग्य दळणवळण, सहकार क्षेत्रात भोर तालुक्यातील सर्वांगीण विकास करण्यासाठी केला.
भौतिक सुखाची लालसा स्व. भाऊंनी कधीही न करता अविरत फक्त आणि फक्त निस्वार्थी समाजसेवा केली.
तीन दशकाहून अधिक काळ समाजसेवेसाठी चंदनासारखा आपला देह झिजविला. वेळोवेळी राजकारणात मिळालेल्या पदाच्या रूपाने त्या संधीचं सोनं केलं .स्वाभिमान व निष्ठेची कधीही तडजोड केली नाही. सामान्य परिस्थितीत शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन आपल्या असामान्य कर्तृत्वाने परिस्थितीवर मात करत सतत संघर्ष करत जनसामान्यांची सेवा केली. स्वर्गीय भाऊंनी केलेल्या विकासकामांच्या रूपानं अनेक चिरंतन "विकास स्मारके" भोर तालुक्यातील जनतेला व युवकांना
त्यांची आठवण सदैव होत राहील. आदरणीय भाऊंच्या कार्यास व आठवणीस अनंत अभिवादन व आदरांजली💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
त्यांची आठवण सदैव होत राहील. आदरणीय भाऊंच्या कार्यास व आठवणीस अनंत अभिवादन व आदरांजली💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
विठ्ठल पवार
पत्रकार.
मो. नं.९२२६८००७८३
