शिवसाम्राज्य प्रतिष्ठानने नसरापूर येथे उभारला सॅनिटायझर कक्ष.

Maharashtra varta
(कोरोनाच्या सुरक्षेसाठी शिव साम्राज्य प्रतिष्ठानने नसरापूर येथे  उभारला सॅनिटायझर कक्ष)
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
कापूरहोळ (प्रतिनिधी):---विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नसरापूर (चेलाडी) येथे सुरक्षेसाठी  सॅनिटायजर कक्ष उभारण्यात आला आहे. ग्रामपंचायत नसरापूर यांच्या  मार्गदर्शनाखाली "शिव साम्राज्य प्रतिष्ठान"  चेलाडी यांनी निर्जंतुकीकरण कक्ष उभारला आहे. 

नसरापूर येथे बाजारनिमित्त व किराणा माल खरेदी करण्यासाठी येणारे नागरिक, प्रशासकीय अधिकारी ,व कर्मचारी ,नसरापूर पोलीस ठाण्यात येणारे अभ्यागत, तक्रारदार आणि पोलिसांच्या सुरक्षेसाठी हा सॅनिटायजर कक्ष उभारण्यात आला आहे.


 भोर तालुक्याच्या पूर्व भागात असा पहिलाच निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्यात आल्याची माहिती  शिव साम्राज्य प्रतिष्ठान चे प्रज्योत कदम यांनी दिली.

निर्जंतुकीकरण कक्ष मंडपच्या वरील  बाजूला चारही रेषेत सॅनिटायझरचा फवारा सुरु होण्यासाठी बटन आहेत. बटन दाबताच सॅनिटायझरचा फवारा होऊन निर्जंतुकीकरण होते. कामानिमित्त व आवश्यक कामासाठी येणाऱ्या नागरिकांच्या   सुरक्षिततेसाठी निर्जंतुकीकरण कक्षाची महत्वाचे आहे.


सॅनिटायझर  कक्ष उभारणे कामी शिवसाम्राज्य प्रतिष्ठान चेलाडी चौक, नसरापूर चे अध्यक्ष प्रज्योत भाऊ कदम, उपाध्यक्ष निखिल भंडारी, विशाल शिंदे, विशाल राजेशिर्के ,ओंकार चोरघे, प्रतिक कोंढाळकर ,कुणाल पांगारे ,अक्षय कदम ,अभिषेक वाईकर, बारीकराव आखाडे, सौरभ शेटे निखिल पवार, उमेश लष्कर
 संदिप दळवी, मारूती मरगळे आदींनी परिश्रम घेतले आहे.
 -शिवसाम्राज्य प्रतिष्ठानचे सर्व सदस्य स्वयंसेवक--
शिवसाम्राज्य प्रतिष्ठानचे सर्व सदस्य चेलाडी नसरापूर येथील नाका बंदी पथकाच्या  ठिकाणी स्वयंसेवक म्हणून देखील उत्कृष्ट काम करीत आहे.
To Top