मेंगाई मंदिर वेल्हे येथे 'फ्लू क्लिनिक' सुरू.

Maharashtra varta
(मेंगाई मंदिर वेल्हे येथे फ्लू क्लिनिक  सुरू )
■■■□■■■■■■■■■■■■■■■■■■■■■

वेल्हे (प्रतिनिधी):--विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

वेल्हे  आणि जवळपासच्या खेड्यातील नागरिकांना फक्त  ताप ,सर्दी ,खोकल्याच्या मोफत उपचारांसाठी  मेंगाई मंदिर वेल्हे येथे फ्लू क्लिनिक  सुरू केले आहे. अशी माहिती 'वेल्हेचे तहसीलदार शिवाजी शिंदे' यांनी दिली.

मेंगाई मंदिर वेल्हे येथे "फ्लू क्लिनिक "रविवार (दि.19)पासून सुरू झाले आहे.  क्लिनिक  सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत तपासणी सुरू असल्याची माहिती दिली.

  मेंगाई मंदिर परिसर दररोज निर्जंतुक केला जात आहे.
रुग्णांना सोशल डिस्टन्ससाठी भरपूर जागा आहे. विशेषत ज्येष्ठ नागरिक व महिलांना फायदा होणार आहे.  सर्वेक्षण करताना घरामधील सर्व काही जण आजारी नसल्याचे सांगत आहे. मात्र ते इतर खासगी डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतात. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी या उपक्रमाचा विशेष फायदा होणार आहे.या दवाखान्यांमध्ये सर्दी, ताप ,खोकला या व्यतिरिक्त इतर पेशंटची तपासणी केली जाणार नाही.

-----------अधिकाऱ्यांचे विशेष कौतुक---------------
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रांत राजेंद्र जाधव , वेल्हेचे तहसीलदार शिवाजी शिंदे,गटविकास अधिकारी
विशाल शिंदे,पोलीस निरीक्षक विनायक देवकर ,आरोग्य अधिकारी व कर्मचारी अहोरात्र  परिश्रम करत आहेत. त्यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

To Top