(महेश धाडवे पाटील व मित्र परिवार ने दखल घेऊन सर्व राजगड पोलीस स्टेशन,किकवी मधील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करताना)
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
कापूरहोळ (प्रतिनिधी):----विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
अखिल मानव जातीवर कोरोना विषाणू संसर्गाचे संकट आले आहे. या आणीबाणीच्या स्थितीतही पोलीस जीवाचे रान करून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करत आहे. शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी दिवसरात्र राबून पोलिस करतात.
या संसर्गाचा धोका ओळखून प्रत्येकजण राबत आहे. पोलिसांना मास्क व सॅनिटायझर मिळणे व पुरवणे महत्वाचे आहे. सुरक्षितरित्या ते कर्तव्य बजावतील. ही बाब ‘. ओळखून सारोळा -शिरवळ चे सामाजिक कार्यकर्ते महेश धाडवे पाटील व मित्र परिवार ने दखल घेऊन सर्व राजगड पोलीस स्टेशन,किकवी मधील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले.
'महाराष्ट्र वार्ताशी' बोलताना "महेश दादा धाडवे पाटील" म्हणाले की,समाजाचा व प्रशासकीय यंत्रणेतील महत्त्वाचा घटक हा पोलीस आहे. समाजातील सर्वांची सुरक्षा पोलीस करतात. आपण देखील त्यांची काळजी घेणे हे आपलं सामाजिक कर्तव्य आहे ते ओळखून हा उपक्रम सुरू केला आहे.
पत्रकार.
मो. नं.९२२६८००७८३
========================
