कापूरहोळ:----
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
भोर ता.कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. सभापती व विद्यमान संचालक "धनाजीराव वाडकर" यांची भरघोस मताधिक्याने "मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती"च्या संचालकपदी विजय मिळवून त्यांनी वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
राज्यातील महाविकासआघाडीचा प्रयोग स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही होऊ लागला आहे. असाच प्रयोग मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही झाला. आज (2 मार्च) या निवडणुकीची मतमोजणी झाली. या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असताना दिसून आली. निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होत.
(APMC Election Result),यामध्ये
भोर ता.कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. सभापती व विद्यमान संचालक धनाजीराव वाडकर यांची भरघोस मताधिक्याने आशिया सर्वांत मोठी असणारी "मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या" संचालकपदी" विजय मिळवून वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादी, काँग्रेस शेकाप आणि शिवसेना यांनी आपले पॅनल बनवले होते. भाजपही या निवडणुकीत सहभागी झाली होती.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
