(भोंगवली ता. भोर येथे सव्वादोन कोटी रुपये खर्चून प्राथमिक आरोग्य केंद्राची अद्ययावत इमारत उभारण्यात आली.,त्याचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करताना)
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
कापूरहोळ (प्रतिनिधी):----------
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
महाराष्ट्र राज्य शासनाची आरोग्यसेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यासाठी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचार्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी सुरू करणार असल्याचे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या तत्कालीन सदस्य व जिल्हा आरोग्य समिती सदस्य तृप्ती विक्रम खुटवड यांच्या प्रयत्नातून भोंगवली ता. भोर येथे सव्वादोन कोटी रुपये खर्चून आरोग्य केंद्राची अद्ययावत इमारत उभारण्यात आली. त्याचे उद्घाटन सुळे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाप्रसंगी पुणे
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, आरोग्य सभापती प्रमोद काकडे ,जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार ,तालुका आरोग्य अधिकारी सूर्यकांत कराळे, तृप्ती खुटवड ,भोर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष संतोष घोरपडे,चंद्रकांत बाठे, पंचायत समितीचे सभापती श्रीधर किंद्रे, उपसभापती दमयंती जाधव ,सदस्य रोहन बाठे, विक्रम खुटवड, भालचंद्र जगताप, रामदास भांडे ,राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते मनोज निगडे,गणेश मोरे,वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोनाली लोणकर ,सरपंच ,उपसरपंच यांच्यासह सदस्य,ग्रामस्थ उपस्थित होते. ते म्हणाले की भोंगवली आरोग्य केंद्राची इमारत खाजगी रुग्णालयात लाजवेल अशी आहे या ठिकाणी मिळणारी सेवा ही अद्ययावत आणि दर्जेदार मिळणे गरजेचे आहे. राज्य सरकारकडून औषधांचा पुरवठा लवकरात लवकर सुरळीत होईल ,तसेच महामार्ग पट्ट्यात ट्रामा केअर सेंटर होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी भोंगवली गावचे ग्रामसेवक आर. डी. शेलार यांनी गावच्या विकासात उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांचा आदर्श ग्रामसेवक म्हणून त्यांचा सन्मान केला, तर भोंगवली आरोग्य केंद्रास विनामूल्य जागा देणारे निगडे यांचा सन्मान केला.
दिलीप लंके यांनी प्रास्ताविक तर प्रसिध्द निवेदक विठ्ठल पवार यांनी सूत्रसंचालन केले .
-------------------------------------------------------------------
