.रायगड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेसाठी शिक्षकांना 6 दिवसांची विशेष रजा मंजुर....

Maharashtra varta
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●○●●●●●●

पुणे( प्रतिनिधी):----
[राष्ट्रीय] प्राथमिक शिक्षक महासंघाच्या नागोठणे (रोहा) जि. रायगड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शिक्षण परिषद व शिक्षक मेळाव्या साठी शिक्षकांना राज्य शासनाने दि.९ मार्च ते १४ मार्च पर्यंत 6 दिवसांची विशेष रजा मंजुर केली असल्याची माहिती,राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी "महाराष्ट्र वार्ताशी" बोलताना माहिती दिली.
 
  तसेच  या विशेष रजा दिवसांत  8 मार्च 2020 व पुढे 15 मार्च  रविवार असल्याने सुट्टी असल्याने
एकुण ८ दिवस शिक्षकांना सुट्टी मिळणार असल्याचे दिसून येते.

तरी लाखोंच्या संख्येने शिक्षक बंधू भगिनींनी  शिक्षण परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन
बाळकृष्ण तांबारे यांनी केले आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
To Top