"भोर तालुक्यातून 700 शिक्षक अधिवेशनास उपस्थित राहणार" :पोपटराव निगडे

Maharashtra varta

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

कापूरहोळ( प्रतिनिधी):----
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

[राष्ट्रीय] प्राथमिक शिक्षक महासंघाच्या नागोठणे (रोहा) जि. रायगड येथे होणाऱ्या "राज्यस्तरीय शिक्षण परिषद व शिक्षक मेळाव्या"साठी भोर तालुक्यातून 700 शिक्षक  उपस्थित राहणार असल्याची माहिती पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष पोपटराव निगडे व  भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सुदामराव ओंबळे यांनी "महाराष्ट्र वार्ताला"   दिली.



शिक्षकांना राज्य शासनाने दि.९ मार्च ते १४ मार्च पर्यंत 6 दिवसांची विशेष रजा मंजुर केली असल्याची माहिती,भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघाने पत्रकार परिषदेत दिली.
 
  तसेच  या विशेष रजा दिवसांत  8 मार्च 2020 व पुढे 15 मार्च  रविवार असल्याने सुट्टी आहे 
एकुण ८ दिवस शिक्षकांना सुट्टी मिळणार असल्याचे दिसून येते.

पत्रकार परिषदे वेळी विजयकुमार थोपटे, तृप्ती पांगारे,पंडित गोळे, महेंद्र अप्पा सावंत,चांगदेव नाना मसुरकर, विकास खुटवड,अनंता आंबवले, भीमराव शिंदे,शीतल टापरे आदी उपस्थित होते.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
To Top