पुणे :-----(विशेष प्रतिनिधी)
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
●● √जागतिक महिला दिन विशेष√●●
असं म्हणतात, कोणत्याही यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो. स्त्री आणि पुरुष ही समाज रथाची दोन चाके आहेत. ही दोन्ही चाके एकसंध असतील तर आणि तरच समाजाचा, पर्यायाने देशाचा विकास होऊ शकतो. जगभरातल्या कला, क्रीडा, साहित्य राजकारण , सहकार या सर्व क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या माता ,भगिनींना आणि स्त्री शक्तींच्या कर्तुत्वाला सलाम करण्यासाठी व 8 मार्च या महिला दिनाच्या प्रसंगी शुभेच्छा कवितेच्या रूपाने देतायेत,मराठी शिलेदार समूहाच्या सदस्या व वाई जि.-सातारच्या ग्रामीण साहित्यिक "छाया जावळे".
"मुक्त मी".........
तुझ्या स्वत्वाचा शोध,
गवसेल बघ तुला...
घे पाऊल पुढती अन,
नाना वाटा खुणावतील तुला.
नवे ध्येय,नवे स्वप्न
येईल तुझ्या हाताशी
नाही मी कुठेच कमी
खूणगाठ बांध मनाशी
तोकडे विचार,न्यूनगंडाची,
मरगळ दे "तू" झटकून.
सृजनशक्ती तुझ्याच ठायी,
बघ जरा आजमावून.
गरुडझेप घे, "तू" अस्मानी.
मुक्त "मी" म्हणत दिपव डोळे.
कर्तृत्वाची पताका ने नभी..
विजयाचे कर साजरे सोहळे.
निश्चयाचा, महामेरू तुझा
नेहमीच अचल राहू दे.
संकटांशी धैर्याने लढण्या-
मनी,मनगटात बळ येऊ दे.
अनेक रूपे वठवतेस तू,
" सलाम तुझ्या स्त्रीशक्तीला",
दिव्यत्वाची येत, राहे प्रचिती.
नि मिळते स्फूर्ती आम्हाला....
●●●●●●●●●●◆◆◆
____ सौ. छाया जावळे
वाई, सातारा
सदस्या, मराठीचे शिलेदार समूह
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
