(तेलवडी ता. भोर येथे सार्वजनिक बांधकाम विभाग,पुणे व प्रधान मंत्री गौण खनिज योजने अंतर्गत ग्रामपंचायत ,तेलवडी येथील क्रांक्रीट रस्ता उदघाटन समारंभाप्रसंगी )
__________________________________________
कापूरहोळ प्रतिनिधी) :-
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
गावात मूलभूत सोयीसुविधाची पूर्तता होणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधी यांनी प्राधान्याने विकासकामे केली पाहिजेत. गावचा विकास होताना एकमेकातील मतभेद, मनभेद बाजूला सारून गावच्या विकासासाठी एकत्र या,असे आवाहन 'पुणे जिल्हा भाजपा चे अध्यक्ष गणेश भेगडे' यांनी केले.
तेलवडी ता. भोर येथे सार्वजनिक बांधकाम विभाग,पुणे व प्रधान मंत्री गौण खनिज योजने अंतर्गत ग्रामपंचायत ,तेलवडी येथील क्रांक्रीट रस्ता उदघाटन समारंभाप्रसंगी ते बोलत होते. तेलवडी येथील या रस्त्यासाठी 10 लक्ष रुपयांची निधी मंजूर होऊन काम पूर्ण झाले .त्या रस्त्याचे नामफलक अनावरण करण्यात आले.तसेच रस्ता सहकार्यकामी गावातील नागरिकांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमा प्रसंगी पुणे जिल्हा भाजपा चे सरचिटणीस धर्माजी खांडरे, भोर तालुका भाजपा चे अध्यक्ष जीवन कोंडे,भाजपा चे सरचिटणीस संतोष धावले,विश्वास ननावरे ,तेलवडी सरपंच दत्तात्रय धावले,विजय धावले,नागेंद्र चौबे, अशोक पांगारे,चंद्रकांत धावले, भरत धावले,नामदेव बांदल,पोपट धावले,हरिदास धावले, विश्वनाथ बांदल,प्रमोद ढम, आदी मान्यवर व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भोर तालुका भाजपाचे सरचिटणीस संतोष धावले यांनी करून सूत्रसंचालन प्रसिध्द निवेदक विठ्ठल पवार यांनी केले.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
