समाज कंटकावर कारवाई करा.:-- शिवभक्त अक्षय अप्पा कदम यांची मागणी....

Maharashtra varta
(जितेंद्र राउताचे फेसबुक अकाऊंट ब्लॉक करावे. त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी,यासाठी राजगड पोलीस स्टेशन,नसरापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे यांच्याकडे "जगदंब युवा प्रतिष्ठान,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने लेखी तक्रार देताना)
●●●●●●●●●●●●●●●●●●●◆◆■■◆◆◆◆◆◆

पुणे (विशेष प्रतिनिधी):----
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

सोशल मिडीया /फेसबुक वर जितेंद्र राऊत या तरूणाने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अश्लील व अवमानकारक पोस्ट केलेबाबत त्याच्यावर कायदेशीर कारवाई  करावी अश्या आशयाची तक्रार जगदंब युवा प्रतिष्ठान,चे अध्यक्ष व शिवभक्त अक्षयआप्पा कदम यांनी केली आहे.

 तक्रार अर्जात पुढे असे म्हटले आहे की, समाजकंटक  जितेंद्र राउताचे फेसबुक अकाऊंट ब्लॉक करावे. त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी. यासाठी राजगड पोलीस स्टेशन,नसरापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे यांच्याकडे  "जगदंब युवा प्रतिष्ठान,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने लेखी तक्रार दिली.  

यावेळी प्रतिष्ठानचे  उपाध्यक्ष शंभु कोंडे,सुरज कोंडे,प्रसाद कोंडे,सागर कडु,निखील कांबळे,अमोल कोंडे,विकी कदम,किशोर कोंडे  उपस्थित होते.
____________________________________________________________________________________
To Top