राजगड ज्ञानपीठचे,कान्होजी जेधे विद्यालयाचा पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर झेंडा .

Maharashtra varta

कान्होजी जेधे विद्यालय,कारी ता. भोर मधील,विज्ञान उपक्रम व प्रयोगशील  शिक्षक रावसाहेब चौधरी यांनी मांडलेल्या" वैज्ञानिक खेळणी प्रकल्पाला", राज्यामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देताना)
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
कापूरहोळ( प्रतिनिधी):-----विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

राजगड ज्ञानपीठ संचलित,  कान्होजी जेधे विद्यालय,कारी ता. भोर मधील,विज्ञान उपक्रम व प्रयोगशील  शिक्षक रावसाहेब चौधरी यांनी मांडलेल्या" वैज्ञानिक खेळणी प्रकल्पाला", राज्यामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले असून त्यांच्यावर अभिनंदनांचा वर्षाव होतो आहे.

दि. 24 ते 27फेब्रुवारी 2020
रोजी आत्मा मलिक शैक्षणिक संकुल कोकमठाण शिर्डी येथे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन नुकतेच  पार पडले .कान्होजी जेधे विद्यालय,कारी तील विज्ञान शिक्षक रावसाहेब चौधरी यांनी मांडलेल्या वैज्ञानिक खेळणी या प्रकल्पाला राज्या मध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक भाभा अणुशक्ती केंद्राचे जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आहेर यांचा हस्ते मिळाले.

त्यावेळी SISE चे संचालक .रमतकर साहेब, राजकुमार अवसरे साहेब व मनीषा भडंग मॅडम उपस्थित होत्या .
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. मंत्री अनंतरावजी थोपटे  ,भोर वेल्हा मुळशीचे आमदार संग्राम थोपटे व संस्थेच्या सचिव डॉ.भाग्यश्री पाटील,साबळेसाहेब, पवार सर,संतोष खोपडे यांनी विषेश अभिनंदन केले.

■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
             विठ्ठल पवार.
                     पत्रकार, भोर
                             मो. नं.९२२६८००७८३
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
To Top