कापूरहोळ:(प्रतिनिधी)----विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
"बोट सुटले हातून तरी
सावली अजून माथ्यावरी.
वात्सल्याचा राहो सदा
आशिर्वाद आम्हावरी.
घेऊनी सामाजिक मानवी मूल्यांचा वसा..
समाजात उमटवला वेगळाच ठसा.
लोकसेवेची आवड भारी
स्नेह फुलविला दारोदारी"....
असे आदर्श जीवन जगून पवार कुंटुबाला आणि समाजाला नवी दिशा व प्रेरणा देणारे ,माणसातील आदर्श माणूस असलेले सारोळा ता. भोर येथील जुन्या व नव्या पिढीचे विचारवंत,मार्गदर्शक उद्योजक आणि सारोळा येथील प्रसिद्ध हॉटेल अमृता गार्डनचे मालक अनिल हरिशचंद्र पवार(वय 55) यांचे बुधवार दि.11 मार्च 2020 रोजी अल्पशा अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या निधनाने उद्योग सामाजिक ,सांस्कृतिक क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे व्यक्तिमत्व आदर्श व मनमिळाऊ, नेत्रदीपक होत.एका चांगल्या व्यक्तीला आपण मुकलो आहोत.अश्या आदर्श माणसाला अर्थात अनिलशेठजी यांना "महाराष्ट्र वार्ताच्या" वतीने भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐💐💐💐💐💐💐---
विठ्ठल पवार.
पत्रकार, पुणे.
मो. नं.९२२६८००७८३.
-----------------------------------------------------------------
