पुणे(विशेष प्रतिनिधी):----
महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन
वसंतोत्सवाचे स्वागत धुळवडीला कसे होते?होळी साजरी कशी केली?? येणारी रंगपंचमी कश्या पध्दतीने साजरी करणार?? या प्रश्नांची उत्तरे सकारात्मक येण्यासाठी सर्वांचे प्रयत्न हवेत. सणांच्या नावाखाली बिभिस्तपणा होणार नाही ,याची काळची सर्वांनीच घ्यायला हवी. रंगांचा बेरंग होऊन धुळवडीच्या रस्त्याने आयुष्याची होळी आणि घराची राखरांगोळी होणार नाही यासाठी सर्वांनी आता दक्ष असायलाच हवे.
आषाढ आमावस्या व धुलीवंदनाच्या दिवशी दारूच्या पुराची पातळी वाढत आहे. वेळीच बांधबंदिस्ती केली नाही तर वसंतऋतुरुपी तारुण्याची पालवी दारूच्या पुरात वाहून जाईल.नंतर उर बडवून झालेले नुकसान भरून येणार नाही. काल होळीची पोळी झाली. आज नळी खायला हरकत नाही... पण दारूला तिथे थारा नको. व्यसनमुक्त युवक ही राष्ट्राची संपत्ती आहे. ती संपत्ती कमी व्हायला नको. त्यात वाढच अपेक्षित आहे.ही विचारधारा "धुळवड" या सुंदरश्या वैचारिक संदेश देणाऱ्या कवितेतून जपण्याचा व सामाजिकतेचा संदेश देणाऱ्या वाई ,जि.सातारच्या उदयोन्मुख ग्रामीण साहित्यिक छाया जावळे.
◆_धुळवड_◆
अंतरलेल्या मनात पेरावी
ओढ हवीशी आपुलकीची.
मंतरलेल्या माया ममतेने,
चला, 'धुळवड' खेळू स्नेहाची.
सारे काही इथेच राहील.
कलहाने मनेच दुरावायची.
क्रोधावरती करू, प्रीत शिंपण,
चला, 'धुळवड' खेळू वात्सल्याची
जहरी शब्दांच्या बाणाने.
हृदयेच उध्वस्त व्हायची.
नात्यांना भक्कम सांधणारी,
चला 'धुळवड' खेळू एकोप्याची
करू या पखरण एकमेकांवर.
अनमोल आचार विचारांची.
देऊ द्वेष लोभाची कुर्बानी,
चला 'धुळवड' खेळू सहिष्णुतेची.
स्मरू या संतवाणी विचारधारा.
अन भूमी ही बलिदानाची.
पंथी पांघरु फुलेच सकला,
चला 'धुळवड' खेळू संस्काराची
'धुळवड' उत्साहाची,हर्षाची
चैत्यन्याच्या तुफानी बरसातीची
लोकधारेतील सद्विचारांची
चला 'धुळवड' खेळू नवक्रांतीची
( सौ. छाया जावळे)
वाई, सातारा.
(सदस्या, मराठीचे शिलेदार समूह)
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
♂♂♂♂◆◆●★♂♀¶★◆◆℅♀■◆◆♀♂℅©®◆
