सीसीएमपीत डॉ.हर्षवर्धन अंतुरकर राज्यात प्रथम)

Maharashtra varta


(सीसीएमपीत डॉ.हर्षवर्धन अंतुरकर राज्यात प्रथम)
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
सातारा (प्रतिनिधी):-----------
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

 कोल्हापूर येथील 'राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाने' "महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या" वतीने घेण्यात आलेल्या "सीसीएमपी" परीक्षेत यश मिळवले आहे.डॉ. हर्षवर्धन अंतुरकर यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकविला आहे. डिसेंबर 2019 मध्ये झालेल्या या परीक्षेचा महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. 


डॉ. हर्षवर्धन अंतुरकर यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकविला असून त्यांनी मिळविलेले यश कौतुकास्पद असून प्रेरणा देणारे आहे.डॉ. अंतुरकर यांचे मेडीटेक पॅथॉलॉजी शिरवळ, निरा व्हॅली मेडिकल असोसिएशन व शिरवळच्या ग्रामस्थांनी विशेष  हार्दिक अभिनंदन व  नागरी सत्कार केला आहे.


तसेच विद्यालयाच्या वतीने सत्कार वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. गजभिये यांच्या हस्ते करण्यात आला. रुग्णांचा उपचार करण्यासाठी अचूक निदान कमीत कमी प्रतिजैविकांचा योग्य वापर करा असे आवाहन त्यांनी केले. ज्ञान अनुभवाचा रुग्णसेवेसाठी वापर करून कमीत कमी पैशांमध्ये दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्यास बांधील असल्याचे डॉ. मनेर यांनी सांगितले.

यावेळी प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी,नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्यांना उप अधिष्ठाता डॉ. सुदेश गंधम सुनीता रामानंद, महेंद्र कुमार बनसोडे, वसंतराव देशमुख, शिरिष शानभाग सुधीर सरोदे ,महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी अध्यक्ष डॉ. राजकुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■



To Top