(अंगणवाडी बीट नसरापूर :-1 मधील, 32 अंगणवाडी शाळांचा बाल आनंद मेळावा कार्यक्रमाप्रसंगीचा एक क्षण)
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
कापूरहोळ:---- ( प्रतिनिधी):----विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
भोर तालुक्यातील "नसरापूर बीट क्र. 1" मधील -32 अंगणवाडी शाळांचा बाल आनंद मेळावा कार्यक्रमास,ग्रामस्थांनी,पालक,
पंचायत समितीचे, व जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, गावांतील पदाधिकारी ,शिक्षणप्रेमी यांनी भरभरून प्रतिसाद देत" माझी अंगणवाडी शाळा, "माझा प्रत्येक विद्यार्थी" ही आपुलकीची भावना जोपासत कार्यक्रमास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती भोर, एकात्मिक बाल विकास सेवा योजना.भोर , अंगणवाडी बीट नसरापूर 1 मधील, 32 अंगणवाडी शाळांचा बाल आनंद मेळावा लक्ष्मी गंगा मंगल कार्यालय, नसरापूर चेलाडी (दि.28) रोजी संपन्न झाला
कार्यक्रमाच्या सुरुवात दिप प्रज्वलाने व सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. स्वागत व योजनगीताने उपस्थितांचे स्वागत केले.
अंगणवाडी शाळेतील मुलांनी हिंदी-मराठी गाण्यांवर सुंदर नृत्य सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. . यावेळेस मुलांनी भारतीय संस्कृतीचे व सामाजिक प्रबोधनाचे अनोखे दर्शन विविध गाण्यांच्या माध्यमातून घडवले. तसेच यावेळी "मायबोली महाराष्ट्राची" यावर आधारित विविध गीते झाली.
अंगणवाडीतील विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलांना उपस्थितांनी,दाद दिली. आंगणवाडीच्या पर्यवेक्षिका जयश्री मोहिते यांनी प्रत्येक अंगणवाडी शाळेस व विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
यावेळेस पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या शलाका कोंडे,भोर पंचायत समितीचे सदस्या पूनम पांगारे,ग्रामसेवक संघटनेचे नारायण शिवरकर, जगताप भाऊसाहेब,कृषी अधिकारी गावडे, राजगड पोलीस स्टेशनच्या धुमाळ मॅडम, अपेक्षा शिंदे विविध गावचे
ग्रामस्थ,पालक,पंचायत समितीचे, व जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, गावांतील,पदाधिकारी ,शिक्षणप्रेमी ,सरपंच, पोलीस पाटील यांनी भरभरून मुलांच्या गाण्यांना प्रतिसाद देत कौतुक केले.
या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक विठ्ठल पवार यांनी केले तर आभार
अंगणवाडीच्या पर्यवेक्षिका जयश्री मोहिते यांनी मानले.
बाल आनंद मेळावा यशस्वी करण्यासाठी आंगणवाडीच्या पर्यवेक्षिका जयश्री मोहिते यांनी उत्कृष्ट नियोजन व आयोजन केले . यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी विशेष प्रयत्न केले.
