कापूरहोळ (प्रतिनिधी ):
गेल्या अनेक वर्षांपासून वाहनधारकांची मागणी होती की, राष्ट्रीय महामार्ग भोर हद्दीत सीएनजी पंप व्हावा. हीच मागणी लक्षात घेऊन कंपनीच्या व शासनाच्या मदतीने किकवी ता. भोर येथे सीएनजी पंप उभारून कार्यन्वित करण्यात आल्याची माहिती "शहीद जयवंत पाटील पेट्रोलियम किकवी"चे मदनराव देशमुख यांनी "महाराष्ट्र वार्ताशी" बोलताना सांगितले.
पुणे- सातारा हायवे, किकवी ता.-भोर जि-पुणे येथे उद्या दि.28 फेब्रुवारी 2020 रोजी शहीद जयवंत पाटील पेट्रोलियम किकवी"येथे सीएनजी पंप चालू होत आहे.
हजारो वाहनधारकांना या "सीएनजी पंपाचा फायदा होणार असून या भागातील वाहनधारक
सीएनजी भरण्यासाठी 40 ते 50 किलोमीटरवर पुणे येथे त्यांना जावे लागत होते. आता या भागात सीएनजी सुरू झाल्याने वेळेची व पैशाची बचत होणार असल्याचे वाहन धारकांचे म्हणणे आहे.
(सीएनजी पम्प संपर्क क्रमांक:-
9975042280)
--------------------------------------------------------------
