(एलिमेंटरी चित्रकला ग्रेड परीक्षेत केंजळ शाळेचा निकाल शंभर टक्के)
--------------------------------------
कापूरहोळ( प्रतिनिधी):----विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
"कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य", यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षा- 2019 एलिमेंटरी ग्रेड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये जि.प.प्राथमिक शाळा केंजळ चा निकाल शंभर टक्के लागला आहे.
एलिमेंटरी परीक्षेस केंजळ शाळेचे चौदा विद्यार्थी बसले होते.हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. श्रावणी पंढरीनाथ भालघरे, .सबाह शाहनवाज डांगे,कादंबरी शिवाजी जाधव , वेदांत विक्रमसिंह रेपे या चार विद्यार्थ्यांनी" ए" ग्रेड' प्राप्त केली
प्राजक्ता समीर बाठे, .संजना सचिन बाठे,.वैष्णवी संदिप बाठे , कुमार शिवाजी बाठे, कुणाल संपत बाठे, प्रेम रविंद्र बाठे, साहिल शंकर बाठे, विवेक गणेश बाठे या आठ विद्यार्थ्यांनी" बी" ग्रेड' प्राप्त केली.
तर शुभम प्रदीप जाधव व विघ्नेश संतोष बाठे या दोन विद्यार्थ्यांनी "सी ग्रेड "प्राप्त केली.
शाळेचे आदर्श व तंत्रस्नेही मुख्याध्यापक आनंदराव बांदल सर व शिक्षक वृंद यांनी सदर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. आदर्श मा. जि.प.सदस्य चंद्रकांतदादा बाठे तसेच केंजळ गावचे सरपंच,उपसरपंच तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व सदस्य ग्रामस्थ पालक यांनी मुलांचे कौतुक आणि अभिनंदन केले.या उत्कृष्ट यशाबद्दल सर्व अधिकारी व पदाधिकारी यांनी मुलांचे व शाळेचे कौतुक करून अभिनंदन केले .
(भोर पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी अशोक गोडसे म्हणाले की, केंजळ शाळा आदर्श व गुणवत्ता पूर्ण असून या शाळेत विविध सहशालेय उपक्रम प्रभावीपणे राबविले जातात. यातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे तालुक्यातील इतर माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांबरोबर.एलिमेंटरी ग्रेड परीक्षेस विद्यार्थी बसवणारी जि.प.शाळा केंजळ ही एकमेव प्राथमिक शाळा आहे)
----------/-------------------------------
