(पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी केंजळ शाळेस भेट देऊन शालेय पोषण आहाराची चव घेत,विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधताना)
-------------------------------------
कापूरहोळ (प्रतिनिधी):---विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
शाळा, विद्यार्थी आणि शिक्षण ही ज्ञानाची त्रिवेणी आहे. ज्ञानमंदिराचा पाया म्हणजे शालेय शिक्षण. शाळा ही मुलांची दुसरी माता असते. आदर्श शाळेचे उदाहरण द्यायचे झाल्यास जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, केंजळचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल, असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी केले.
केंजळ ता. भोर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस
(दि.20)फेब्रुवारी रोजी पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी अकस्मात सदिच्छा भेट दिली. केंजळ सारखी आदर्श असावी, जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळा असे गौरव उदगार काढत शाळेतील भौतिक व गुणात्मक दर्जा उत्कृष्ट असल्याचे मत "महाराष्ट्र वार्ताशी" बोलताना व्यक्त केले.
यावेळी उपाध्यक्ष शिवतरे यांनी या शाळेत सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेतली.'शालेय पोषण आहाराची चव घेतली.विद्यार्थ्यांशी पोषण आहाराबद्दल संवाद साधला. विद्यार्थ्यांनी समर्पकपणे उत्तरे दिली.शालेय पोषण आहार दर्जाबाबत समाधान व्यक्त केले.शालेय विद्यार्थांची गुणवत्ता वाढवण्यासाठी त्यांना पहिल्या वर्गापासूनच स्पर्धा परीक्षांची जोड कशी देता येईल, याबाबत सर्व शिक्षकांशी सुसंवाद साधला.
या प्रसंगी इयत्ता ७वी च्या विद्यार्थांनी 'ओळख विविध देशांची'या आजच पू्र्ण केलेल्या हस्तलिखिताचे प्रकाशन रणजित शिवतरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या प्रसंगी मा.आदर्श जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांतदादा बाठे ,केंजळच्या सरपंच मायाताई नेवसे,उपसरपंच महेश बाठे व ग्रामस्थ ,शाळेतील मुख्याध्यापक जे. के. पाटील, बांदल सर व धनंजय भिलारे व इतर शिक्षक आणि ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती चे सदस्य उपस्थित होते.
---------------------------
(केंजळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता ७वी च्या विद्यार्थ्यांनी 'ओळख विविध देशांची' निर्मित हस्तलिखिताचे प्रकाशन रणजित शिवतरे यांच्या शुभहस्ते करताना).
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
