कापूरहोळ (प्रतिनिधी):-विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम हवेली तालुका अध्यक्षपदी अनिरुद्ध यादव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
जिल्हाध्यक्ष गणेशतात्या भेगडे यांनी ही निवड केली असल्याची माहिती "महाराष्ट्र वार्ताला" देण्यात आली.
त्यांच्या या निवडीबद्दल पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष गणेश भेगडे,खडकवासला विधानसभा मतदार संघाचे आमदार भीमराव तापकीर,पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस बाळासाहेब गरुड,
मा. अध्यक्ष अभिजित धावडे, राजेंद्र दिघे,भोर तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जीवन कोंडे,दीपक रजपूत, मा. अध्यक्ष गणेश निगडे,अमित सापते,शरद गुजर आदींनी अभिनंदन केले.
अनिरुद्ध यादव हे हवेली पंचायत समितीचे सदस्य म्हणून उत्कृष्ट काम करीत आहेत. त्याचबरोबर शिवगंगा प्रतिष्ठान व भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबविले आहेत.ते उत्कृष्ट युवा संघटक व अभ्यासू सामाजिक ,राजकीय नेता म्हणून हवेली तालुक्यात परिचित आहेत.सामाजिक प्रश्नांची जाण असलेल्या अनिरुद्ध यादव यांची निवड झाल्यामुळे पुणे जिल्ह्यामधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.
-------------------------------------------------------------------
