भोर तहसील कार्यालयावर भाजपकडून उद्या मोर्चाचे आयोजन.

Maharashtra varta


----------------------------------
पुणे (प्रतिनिधी):------------
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

 महा विकास आघाडी सरकारने गेल्या तीन महिन्यात जलयुक्त शिवारसह जनतेच्या हिताच्या अनेक निर्णयाच्या कामांना स्थगिती दिली आहे. सातबारा कोरा करू असे आश्वासन देणाऱ्या राज्यातील सत्तेवर आलेल्या सरकारने शेतकरी वर्गाची घोर निराशा केली आहे. त्याच्या निषेधार्थ मंगळवारी (ता. 25) रोजी भोर तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन "भोर तालुका भारतीय जनता पक्षाने" केले असल्याची  माहिती भोर तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जीवन आप्पा कोंडे यांनी दिली.

 केळवडे ता. भोर येथे शनिवारी (ता. 22 )रोजी   झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी भाजपा तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र मोरे, भोर शहराध्यक्ष सचिन मांडके,  युवा मोर्चाचे अध्यक्ष अमर बुदगुडे, विश्वास ननावरे, संतोष धावले,भोरच्या मा. नगराध्यक्षा दिपाली शेटे, प्रदिप खोपडे, डॉ. नागेंद्र चौबे, कपिल दुसंगे, अशोक पांगारे, विजयकुमार वाकडे, विष्णू कांबळे,राजेंद्र धाडवे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री रवि अनासपुरे, जिल्हाध्यक्ष गणेशतात्या भेगडे, संघटन सरचिटणिस सचिन सदावर्ते, जिल्हा सरचिटणिस बाळासाहेब गरुड आदी यावेळी उपस्थित राहणार असल्याचे कोंडे यांनी सांगितले.
--------------------------------
                     महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन, पुणे.
---------------------------------
To Top