जनमनातील युवा नेतृत्वाच्या हत्येने महाराष्ट्र हळहळतोय......

Maharashtra varta

--------------------------------
भोर  (प्रतिनिधी):विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाइन)

आपल्या  आचार, विचार ,आणि उच्चाराने व प्रहारचे संस्थापक अध्यक्ष  व राज्यमंत्री ना. बच्चू भाऊ कडू यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन,समाज व राजकारणात विहंगतेने काम  करणाऱ्या समाजाला प्रगल्भ विचार व कामातून प्रतिभा शक्ती निर्माण करून  जनसामान्यांच्या  मनावर अधिराज्य गाजवणारे आणि त्याचबरोबर बुद्धीप्रामाण्यवादाची कास धरून  समाजामध्ये एक नवी प्रतिभावंत जागृती करणारा, आदर्श प्रहार सेवक, आदर्श सामाजिक ,सांस्कृतिक कार्यकर्ता तुषार पुंडकर यांचे दिनांक 21 फेब्रुवारी  2020 रोजी अज्ञाताने केलेल्या हल्ल्यात निधन झालं. 

तुषार पुंडकर हे प्रहार जनशक्ती पक्षाचे अकोल्याचे मा. जिल्हाप्रमुख होते.राज्यमंत्री तथा प्रहार संस्थापक ना.बच्चू कडू यांच्या अत्यन्त निकटवर्तीय होते.गेली ३ वर्ष सातत्याने त्यांनी प्रहार संघटन वाढीसाठी अतोनात परिश्रम केले होते.कुशल संघटक अशी त्यांची ओळख होती.प्रहार जनशक्ती पक्षाच्या विविध आंदोलन,मोर्चे याच्या नियोजनात त्यांचा महत्वाचा वाटा व भूमिका रहात होती.

तुषार पुंडकर हे प्रहार चे अकोल्या चे मा. जिल्हाप्रमुख, अकोला जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष होते ,तर त्यांच्या मातोश्री नगरपरिषद अकोट सदस्य व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आहेत.आपल्या अफाट लोकसंग्रहातून त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली होती.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी २३ हजारावर मतदान घेऊन प्रहार करिता राज्याचे लक्ष वेधले होते.

त्यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक ,वैचारिक सृष्टीतला एक लखलखता कसदार नाणे असलेला आदर्श युवा तारा अंतर्धान पावला.युवकांचा तुषार  हरपला अशी भावना प्रत्येक प्रहार बंधू भगिनींच्या बोलण्यातून व सोशल मीडियावरून व्यक्त होत होती.गेल्या 4 वर्षांहून अधिक काळ समाज क्षेत्रात  कार्यकर्ता व युवकांचे प्रतिनिधित्व करणारा नेता म्हणून  समृद्ध काम केलं. तुषार पुंडकर  हे हाडामासाचा अतिशय विरळ सामाजिक व राजकीय व्यक्तिमत्व होतं. आयुष्यभर सच्चेपणा जगणारा युवक होता. एक प्रभावशाली नेता, कार्यकर्ता होता.त्यांच्याकडे खोटं नावाची गोष्ट नव्हती .जगायचं तर तर्क निष्ठेने ,कुठली गोष्ट तावून-सुलाखून विश्लेषण करूनच ते जगले. त्यांनी माणसाचे महत्त्व खूप मानलं. सर्वांना सामावून घेण्याची त्यांची वृत्ती होती. त्यांची समाज  व राजकारणातील व्यक्तिरेखाही तेवढ्यात जोमात, "तुषार पुंडकर" हे नावच सर्वाना सामावून घेणार होत.

 सर्व सामान्यांच्या  जीवनात नवं भावविश्व निर्माण करणारे ते होते. प्रहार पक्षातील पदाधिकाऱ्यात आदर्श व कार्यकर्त्यांमध्ये अग्रभागी तुषार पुंडकर यांचं नाव  होत. प्रहार पक्षाचं ,कार्यकर्त्यांच,काम अथवा गावच, मित्राचं अथवा आपल्या जन्मभूमीच्या गावच्या प्रत्येक कार्यात हिरीरीने सहभाग असणारे व कल्पकतेने काम करणारे  5 वर्षेहून अधिक काळ समाज क्षेत्रात चांगलं काम केलं.ते ज्यावेळी बोलत असायचे , त्यामागे एक विचार व जनतेचा विकास होता . जनतेच्या प्रश्नाच्या  व सामाजिक चळवळीच्या  आंदोलनात आपल्या कामाची छाप पाडणारा युवक  नेता होता.एक कुशल सामाजिक व राजकीय कार्यकर्ता ,चांगलं नेतृत्व ,कर्तृत्व,आणि  आदर्शवत कामांची ,व्यक्तिमत्वाची छाप प्रहार बंधू भगिनींच्या डोक्यातून व स्मरणातून जाऊ शकत नाही.

समाज व राजकारणाच्या प्रकाशात दिसलेला "तुषार पुंडकर" हा आदर्श युवा  व्यक्तिमत्त्व होतं . सामाजिक बांधीलकीतून समाजासाठी झटणारा, झगडणारा ,संघर्ष करून सर्वसामान्यांना न्याय देणारा तुषारची वेगळी ओळख होती.तुषारच्या अकाली जाण्याने सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला आहे. तुषार पुंडकर आपल्यात नाहीत ,यावर विश्वासच बसत नाही, ही कल्पना मनाला असह्य करणारी आहे.प्रहार पक्षाचं व सामाजिक क्षेत्राचं, खूप मोठ नुकसान झाले आहे. समस्त प्रहार परिवारावर व  अकोट वासीयांवर  शोककळा पसरली आहे. 


---जनमनातील युवा नेतृत्वाच्या हत्येने महाराष्ट्र हळहळला....
 
तुषारच्या अंत्यविधी समयी ''तुषार दादा अमर रहे'’ ह्या दुःखद गगनभेदी घोषणांनी आसमंत निनादून गेला.रस्त्यावर अलोट जनसागर उसळला होता.एका सामान्य कार्यकर्त्याच्या अंत्यदर्शनाला व अखेरचा निरोप देण्यासाठी  अकोट शहरात महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातुन हजारो कार्यकर्ते आले होते.

----तुषारभाऊंच्या नावापुढे "आमदार' म्हणून पाहण्याची इच्छा आता कधीच पूर्ण होणार नाही......

तुषारभाऊंच्या आकस्मिक निधनाने सर्व सामान्यांची  व युवकांची इच्छा होती की,तुषारभाऊंच्या नावापुढे आमदार म्हणून पाहण्याची , ती इच्छा आता कधीच पूर्ण होणार नाही.

    -----तुषारच्या निधनाबद्दल राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू म्हणाले की,
प्रहारचा  माझा निष्ठावान सेवक व आधार हरपला. तुषारने  प्रहारसाठी  व पक्ष संघटन बांधणीसाठी खूप मोठं योगदान दिले आहे.त्याच्या निधनाने खूप मोठा धक्का बसला आहे.कधीही न भरून येणारी हानी झाली आहे.

 "महाराष्ट्र वार्ताच्या वतीने" व प्रहार पक्षाच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली,श्रद्धांजली.💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
----------------------------
विठ्ठल पवार.
पत्रकार, पुणे.
मो. नं.९२२६८००७८३.
-------------------------------
To Top