कापूरहोळ:--(प्रतिनिधी)----विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
"तनिष्का व्यासपीठ भोर" आणि "उन्नती महिला प्रतिष्ठान, भोर" यांच्या संयुक्त विद्यमाने 8 मार्च 2020 रोजी सायं. 6 ते 8 या वेळेत गं. पं. वाचनालय भोर येथे महिला दिनानिमित्त आयोजित पाककला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तनिष्का व्यासपीठाच्या समन्वयक व उन्नती महिला प्रतिष्ठाच्या अध्यक्षा व भोरच्या महिला दक्ष समितीच्या अध्यक्षा सीमाताई तनपुरे यांनी "महाराष्ट्र वार्ताशी" बोलताना सांगितले.
या कार्यक्रमात भोर व वेल्हा तालुक्यातील आदर्श महिलांचा सन्मान व महिलांसाठी पाककला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमासाठी आमदार संग्राम थोपटे व भोरच्या नगराध्यक्षा निर्मलाताई आवारे, भोर पोलिस स्टेशनचे निरीक्षक राजू मोरे, मा. पोलीस निरीक्षक पांडुरंग सुतार, मुख्याध्यापिका नीलम पाटील, भोर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भुजंगराव दाभाडे, सरपंच परिषदेच्या अध्यक्षा रेखा टापरे व सलीम भाई आतार ,भोर वन विभागाचे उपविभागीय वनधिकारी आशाताई भोंग व
तनिष्का व्यासपीठ भोर आणि उन्नती महिला प्रतिष्ठानच्या आणि महिला दक्षता समितीच्या सदस्या उपस्थित राहणार आहेत.
--------------------------------------------------
महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन, पुणे.
-----------------------------------------------------
