(अक्कलकोट जि. सोलापूर येथे येथे झालेल्या जिल्हा व तालुका संघाच्या वार्षिक मेळाव्यात भोर तालुका पत्रकार संघाला वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.)
------------------------------------------
कापूरहोळ( प्रतिनिधी):---विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने परिषदेचे स्वर्गीय अध्यक्ष वसंतराव काणे यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार भोर तालुका पत्रकार संघाला प्रदान करण्यात आला.
अक्कलकोट जि. सोलापूर येथे (दि 8. फेब्रुवारी) रोजी झालेल्या जिल्हा व तालुका संघाच्या वार्षिक मेळाव्यात भोर तालुका पत्रकार संघाला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख सचिन शेट्टी ,जिल्हाध्यक्ष सुनीलजी लोणकर, माजी अध्यक्ष बापूसाहेब गोरे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले .
यावेळी भोर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भुजंगराव दाभाडे उपाध्यक्ष वैभव भुतकर, जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत किंद्रे, मा. अध्यक्ष किरण बधे, जिल्हा समन्वयक संजयदादा इंगुळकर ,माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, नितीन धारणे सारंग शेटे, अर्जुन खोपडे, स्वप्नील पहिलवान उपस्थित होते .
सचिव अंकुश वीर, विजय जाधव पुरुषोत्तम मुसळे,सहसचिव बाळू शिंदे, विठ्ठल पवार,किरण दिघे, कोषाध्यक्ष संतोष मस्के ,राहुल पांगारे, माणिक पवार यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले .
( पुरस्काराला उत्तर देताना व महाराष्ट्र वार्ताशी बोलताना ,भोर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भुजंगराव दाभाडे म्हणाले की, सामाजिक बांधिलकी समजून पत्रकार सामाजिक व इतर क्षेत्रात अधिकाधिक समाजाभिमुख काम मी आणि माझे सर्व सहकारी करत गेले .समाजाची नाळ असलेल्या पत्रकार हा समाजाचा आरसा असतो, हे प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून दाखवून आम्ही सर्वांनी समाजासमोर आदर्श प्रस्थापित केला आहे. त्या सामाजिक कामाची पोचपावती म्हणजे भोर तालुका पत्रकार संघ हा पत्रकार संघाला मिळालेला हा पुरस्कार आहे.)
-------------------------------------------------------------------
