(आपुलकी नागरी पतसंस्थेचा उदघाटन समारंभ आमदार भीमराव अण्णा तापकीर व महापौर मुरलीधर मोहळ यांच्या हस्ते संपन्न झाला.)
""""""""""""""""""""""""""""""""""""""""
पुणे (प्रतिनिधी)विठ्ठल पवार
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
सहकारात पतसंस्थांनी मोलाचे काम केले असून ग्रामीण व शहरी भागाच्या विकासात आपला मोलाचा वाटा उचलला आहे. पतसंस्थेचे काम अधिकाधिक सहकाराभिमुख झाल्यास केंद्रबिंदू मानला गेलेला सामान्य माणूस सक्षम होण्यास मदत होईल असे प्रतिपादन खडकवासला मतदार संघाचे आमदार भीमराव अण्णा तापकीर यांनी केले
आपुलकी नागरी पतसंस्थेचा उदघाटन समारंभ शनिवार(दि-8)रोजी संपन्न झाला. त्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार तापकीर यांनी आपुलकी संस्थेच्या गौरवशाली वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहळ यांच्या हस्ते आपुलकी पतसंस्थेचे उदघाटन संपन्न झाले.यावेळेस महापौर मोहळ बोलताना म्हणाले की ,आपुलकी या पतसंस्थेने नावाप्रमाणे ग्राहकांप्रति व सभासद, ठेवीदार, यांच्यात आपुलकी निर्माण करत "एकमेकां सहाय्य करू,अवघे धरू सुपंथ" या नात्याप्रमाणे उत्कृष्ट काम करत आपला आगळावेगळा ठसा उमटवला आहे.,असे सांगून संस्थेचे महत्त्व त्यांनी पटवून दिले.
या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली ताई चाकणकर,पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक राजाभाऊ लायगुडे ,युवराज बेलदरे,वेल्हे पंचायत समितीचे सदस्य अनंता दारवटकर व इतर सर्व मान्यवर तसेच संचालक, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपुलकी पतसंस्थेचे अध्यक्ष संजय पायगुडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.बोलताना त्यांनी आपुलकी पतसंस्थेने12 व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल वाटचाल व्यक्त केली. ,तर संस्थेचे उपाध्यक्ष बाळकृष्ण दारवटकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर आभार संस्थेचे सचिव संतोष तोडकर यांनी मानले.
----------------------------------------------------------------
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क
विठ्ठल पवार.
पुणे.मो. नं.९२२६८००७८३
