निष्ठेने काम केल्यास राजकीय क्षेत्रात यश हमखास :राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

Maharashtra varta
(वेल्हे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित जाहीर नागरी सत्कार कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री नामदार दत्तात्रय (मामा)भरणे)
(छाया- राजतोरणा फोटो स्टुडिओ)
--------------------------------------------.
वेल्हे (प्रतिनिधी)विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

पक्षाशी प्रामाणिक व निष्ठेने काम केल्यास राजकीय क्षेत्रात यश हमखास मिळते.त्यासाठी पक्षाने दिलेले काम जबाबदारीने करणे. तुमचं काम कधीही  पदासाठी नसावे . प्रत्येकाने अखंडपणे  सक्रिय प्रामाणिक कार्यकर्त्याची भूमिका जोपासली तर न मागता आपणास पदांचा व मानसन्मानाचा चढता आलेख प्राप्त होतो असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री नामदार दत्तात्रय (मामा)भरणे यांनी केले.

 वेल्हे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित जाहीर नागरी सत्कार शनिवार (दि. ८) रोजी शिवगोरक्ष मंगल कार्यालय वेल्हे ,बाजार पेठ येथे संपन्न झाला.या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री नामदार दत्तात्रय (मामा)भरणे व  पुणे जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी रणजित शिवतरे, आणि  पुणे जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समिती सभापती पदी पूजा पारगे यांची निवड झाल्याने त्यांचा नागरी सत्कार समारंभ संपन्न झाला.त्यावेळेस राज्यमंत्री भरणे बोलत होते, ते पुढे म्हणाले पदे येतात ,पदे जातात, सत्ता आज असते, उद्या नसते, हे लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी व पदाधिकारी यांनी लोकाभिमुख कामे करत चालत राहिले पाहिजे,चालणाऱ्यांनाच ध्येय गाठता येते.,असे त्यांनी सांगितले.

पुणे जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी रणजित शिवतरे यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाची ध्येय, धोरणे,विचार व विकासकामे  तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवा. जिल्हा परिषद पुणे च्या माध्यमातून वेल्हे तालुक्यासाठी लाखो रुपयांची निधी दिला जाईल, विकासकामे होताना पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी होत असलेल्या  कामांकडे बारकाईने लक्ष देऊन विकासकामे चांगली करून घ्या,असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी पुणे जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समिती सभापती पदी पूजा पारगे,पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन रमेश अप्पा थोरात, तसेच पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी मनोगत व्यक्त केले.

वेल्हे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शंकर नाना भुरूक, व रेवनाथ अण्णा दारवटकर यांनी मनोगत व्यक्त करत वेल्हे तालुक्यातील समस्या मांडल्या.

या कार्यक्रमाप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आनंदा देशमाने व इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

या  कार्यक्रमाप्रसंगी चंद्रकांतदादा बाठे ,नवनाथ पारगे,लहुनाना शेलार, भगवान बांदल,किरण भाऊ राऊत,प्रमोद लोहकरे, अनंता दारवटकर,किसन जागडे, योगिता तोडकर, रमेश शिंदे, सुधीर रेणुसे, हनुमंत कार्ले, लक्ष्मण तावरे,नंदू रसाळ,अरुण राऊत,दत्ता भडाळे,सुनील फाळके, मारुती शिर्के,रमेश शिर्के आदी पदाधिकारी व कार्यकर्ते ग्रामस्थ,मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वेल्हे तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष संतोष रेणुसे यांनी करून आभार संदीपभाऊ खुटवड यांनी मानले. तर कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रसिध्द निवेदक विठ्ठल पवार यांनी केले.
-------------------------------------------------------------------
To Top