11 महिन्याच्या चिमुरड्याला लागली, कोट्यवधी रुपयांची लॉटरी

Maharashtra varta

पुणे (प्रतिनिधी):-

(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
    देने वाला जब भी देता, देता छप्पर फाडके असे हिंदीत एक गाणे आहे. 11 महिन्याच्या चिमुरड्याच्या नशीबाला साजेसे असे गाणे  आहे. कारण त्याला कोट्यवधी रुपयांची लॉटरी लागली आहे.

दुबईत राहणार्‍या मूळचे हिंदुस्थानी रमीज रहमान यांनी आपला मुलगा मोहम्मद सलाह याच्या नावाने एक लॉटरीचे तिकीट काढले होते. या लॉटरीच्या बक्षीस एक मिलियन अमेरिकन डॉलर इतकी होती. हिंदुस्थानी रुपयात त्याची किंमत सात कोटी इतकी आहे. गेल्या महिन्यात रमीज यांनी दुबई ड्युटी फ्री स्कीममधून मोहम्मद सलाहच्या नावाने लॉटरीचे तिकीट काढले होते. त्याचा लकी ड्रॉ निघाल्यानंतर मोहम्मदच्या सलाह ही लॉटरी जिंकली होता. आपल्या मुलाच्या नावाने तिकीट काढली  आपण खूप नशीबवान आहोत अशी प्रतिक्रिया रमीज रहमान यांनी दिली. आता हे पैसे मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी आपण वापरणार असे त्यांनी सांगितले.

------------------------------------------------------------------
To Top