खेड शिवापूर टोल नाका हटाव आंदोलनास, भोर पंचायत समितीचा पाठिंबा

Maharashtra varta


(खेड शिवापूर टोल नाका हटाव आंदोलनास ,भोर पंचायत समितीचा पाठिंबा)
""""""'"'"''"''''''''""""'"'''"''''''"'''''''''''''''''''"""""""""""'"""""""'
-------------------------------------------------------

कापूरहोळ (प्रतिनिधी):-
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

   राष्ट्रीय महामार्गावरील खेड-शिवापूर टोल नाका हटविण्यासाठी 16 फेब्रुवारी 2020 ला जनआंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पंचायत समितीच्या दि. 6 फेब्रुवारी 2020 ला  मासिक बैठक झाली .त्या बैठकीत टोल नाका हटाव आंदोलन पाठींब्याचा ठराव करून सर्वानुमते मंजूर करण्यात आला असल्याची माहिती  भोर पंचायत समितीचे सभापती श्रीधर किंद्रे यांनी "महाराष्ट्र वार्ताला" दिली आहे.

 खेड-शिवापूर येथील टोल नाका हटवण्यासाठी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडे अखंडपणे पाठपुरावा सुरू होता. मात्र त्यास यश येत नव्हते. त्यामुळे 16 फेब्रुवारीला सर्वपक्षीय जन आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी खेड शिवापूर टोल नाका हटाव कृती समितीच्या वतीने (दि.3फेब्रुवारीला)सभापती श्रीधर किंद्रे  यांना निवेदन देण्यात आले होते.

 त्यानुसार  दि.6 फेब्रुवारी  रोजी झालेल्या भोर  पंचायत समितीच्या मासिक मिटिंग मध्ये सभेचे अध्यक्ष सभापती श्रीधर किंद्रे यांनी ठराव मांडून तो सर्वानुमते मंजूर करून खेड-शिवापूर येथील टोल नाका  हटवण्यासाठी खेड शिवापूर टोल हटाव कृती समितीच्या वतीने पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आहे.

यावेळी गटविकास अधिकारी  विशाल तनपुरे, उपसभापती दमयंती जाधव, सदस्य लहूनाना शेलार, मंगला बोडके ,रोहन बाठे ,पूनम पांगारे उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्र वार्ताशी बोलताना सभापती श्रीधर किंद्रे म्हणाले की, भोर तालुक्याच्या विकासाला अडसर निर्माण करणारा खेडशिवापुर टोलनाका हटविणे ही काळाची गरज असून त्यासाठी जनआंदोलनात प्रत्येकाने सहभागी होऊन बांधिलकी जोपासावी.
-------------------------------------------------------------------
To Top