१६ फेब्रुवारी २०२० टोलनाका मुक्ती दिन.?.....

Maharashtra varta
----------------"""""''''''''( छायाचित्र:- डॉ.संजय जगताप)
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

पुणे( प्रतिनिधी):---------------
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

खेड शिवापुर टोलनाका हटाव,धरणे आंदोलन रविवार दि. १६ फेब्रुवारी २०२०रोजी,सकाळी १० वाजता  खेडशिवापूर टोल नाका, खेड शिवापूर, तालुका - हवेली, जिल्हा - पुणे येथे होणार असून सर्वांनी  आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन टोल नाका हटाव कृती समितीच्या वतीने  करण्यात आले आहे.

"१६ फेब्रुवारी २०२० हा कायमचा टोलनाका मुक्ती दिन ठरवु या,अश्या आशयाचे मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर टोल नाका हटाव कृती समितीच्या सदस्यांनी पुढील आशयाचा मजकूर प्रसिद्धीस व महितीस्तव सादर करून जागृती निर्माण करताना दिसून येत आहे. तो मजकूर पुढीलप्रमाणे आहे,
भोर, वेल्हा, हवेली व पुरंदर तालुक्यांच्या विकासाला मोठा अडसर होत असलेला शिवापुर टोल नाका हा देशातल्या सर्वात भ्रष्ट अशा टोल धोरणाचाच भाग आहे. भोर, वेल्हा, हवेली व पुरंदर येथील सामान्य जनता सोशिक आहे याचाच गैरफायदा उठवला गेला व टोलनाक्याचे भुत आपल्या मानगुटीवर बसवले गेले. हेच टोलनाक्याचे भुत हटविण्यासाठी आपण सर्वपक्षीय व सर्व सामाजिक संघटनांना *"शिवापुर टोल नाका हटाव कृती समिती"* म्हणुन हाक दिली. हा प्रश्न आपल्या सर्वांचा आहे याची जाण ठेवून सर्व सहकारी संघटीत झाले व लोकप्रतिनिधीही आक्रमक झाले. तब्बल १० वर्षे अर्धवट असलेल्या कामांना पहीला तडाखा बसला, प्रशासन हलले, महामार्गाच्या कामाचे चित्र बदलू लागले व कृती समितीला यश मिळाले.

मात्र आता लढा आपल्या प्रमुख मागणीसाठी...

टोल नाका तात्काळ बंद करा व  PMRDA च्या हद्दीबाहेर त्वरीत हलवा....

खेड शिवापूर टोलनाका हटविणे,  ही आर पारची लढाई आहे. *कोल्हापूर शहरातुन जनतेने टोल नाके हद्दपार केले..नियोजनबद्ध आंदोलन केले. कुणीही आमंत्रणाची, मानपानाची वाट पाहीली नाही*. त्यामुळे सरकार वाकले, ठेकेदाराचे सर्व पैसे देण्याचे सरकारने मान्य करीत जनतेच्या डोक्यावरचे टोलचे भुत उतरवले. ही ताकद सामान्य जनतेत आहे हे त्यांनी दाखवून दिले. 

मग हे भोर, वेल्हा, हवेली व पुरंदर मधील मावळ्यांना का जमणार नाही...आता वेळ आपली आहे.

आपला इतिहास पराक्रमाचा, शौर्याचा आहे व आपण हा इतिहास घडवणार आहोत. त्याचे केवळ साक्षीदार नव्हे तर भागीदार होणार आहोत. समितीच्या प्रत्येक सदस्याने येणारया १० दिवसात समाजातील प्रत्येक व शेवटच्या  घटका पर्यंत जावे.. स्वयंस्फुर्तीने कामाची जबाबदारी वाटून घ्यावी.. प्रत्येक आघाडीवर लढण्यासाठी तयार रहावे. 

आता रणशिंग फुंकले आहे, माघार नाही.

"आमच्या बापजाद्यांनी इथला टोल नाका इथल्याच मातीत गाडला होता" .हे आमच्या पुढच्या पिढीला अभिमानाने सांगण्याची संधी मिळाली पाहीजे. अन्यथा आपल्याच भूमीत 'ओळखपत्र' दाखऊन टोल माफीची भिक पदरात पाडून घेण्यात पुढचीही पिढी लाचार होईल!!

आता नाही, तर कधीच नाही.

२०११ नंतर तब्बल ९ वर्षांनी हा संघर्ष उभा राहतोय.. पुन्हा हे शक्य नाही. म्हणुनच रात्र अन् दिवस ही वैऱ्याची समजुन काम करूया!

 सर्वांनी आपला बहुमुल्य वेळ काढून  तालुक्यांच्या विकासात मोठा अडसर होत असलेला शिवापूर टोल नाका हटाव आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन आपल्या तालुक्यांच्या विकासाला हातभार लावू या व पुढच्या पिढीचे भविष्य उज्वल करू या. 

वरील  आशयाचा मजकूर सोशल मीडियावर व्हायरल केला असून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येते आहे.

आंदोलनात विविध संघटनांचा पाठींबा......
(भोर, वेल्हा, हवेली ,आणि शिरवळ येथील जीप संघटनेने या होणाऱ्या  आंदोलनास सक्रिय पाठींबा दिला असून या मध्ये अनेक सामाजिक, राजकिय पक्ष ,संस्था, प्रतिष्ठान सहभागी होणार असल्याचे दिसून येते आहे.)
-------------------------------------------------------------------
To Top